पाठीमागून ठोकरल्याने दांपत्य जखमी, सोळशी फाट्यावर चारचाकी-दुचाकीत अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 14:34 IST2019-07-13T14:31:49+5:302019-07-13T14:34:00+5:30
महामार्गावर वेळे येथील सोळशी फाट्यावर चारचाकी व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दांपत्य गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडला.

पाठीमागून ठोकरल्याने दांपत्य जखमी, सोळशी फाट्यावर चारचाकी-दुचाकीत अपघात
वेळे/सातारा : महामार्गावर वेळे येथील सोळशी फाट्यावर चारचाकी व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दांपत्य गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत अधिक महिती अशी की, चारचाकी क्र. . MH09 CM 1810 व दुचाकी क्र. MH 11 BS 6601 ही दोन्हीही वाहने सातारा बाजूकडून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी चारचाकीने (वाहन चालक सुनील कांबळे, रा. सांगली) दुचाकीला पाठीमागून ठोकरले.
त्यामुळे दुचाकीवरील दांपत्य सूर्यकांत बाबर व स्वाती बाबर आणि त्यांची एक छोटी मुलगी रा. किकली, ता.वाई, जि.सातारा हे दुचाकीवरून खाली पडले. या अपघातात सूर्यकांत बाबर यांचा पाय मोडला असून स्वाती बाबर यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. सुदैवाने छोटी मुलगी या अपघातातून बचावली. अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.