शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP: विरोधात लढला, विरोधात बसा; भाजपबरोबर जुळणे कठीण !

By नितीन काळेल | Updated: March 14, 2026 16:15 IST

भाजपवरच उलटला गेम..., राष्ट्रवादी-शिंदेसेना सदस्यांची भूमिका : एकाधिकारशाहीच घातकी ठरण्याची शक्यता

नितीन काळेलसातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक काही दिवसांवर आली असून भाजपकडून सत्तेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पण, टूरवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आणि शिंदेसेनेच्या सदस्यांनी आक्रमक होत ‘विरोधात लढला आता विरोधातच बसा’ अशी भूमिका घेतल्याचे समोर येत आहे. यामुळे भाजपबरोबर या दोन्ही पक्षाचे जुळणे कठीण झालेले आहे. तसेच भाजपची सुरुवातीपासूनची एकाधिकारशाहीची भूमिका हीच विरोधी बाकावर बसण्याची वेळही आणू शकते, अशी चर्चाही सुरू झालेली आहे.सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक एक महिन्यापूर्वी झाली. तसेच निकाल जाहीर होऊनही महिना उलटला आहे. आता २० मार्चला जिल्हा परिषदेच्या कारभारीपदाची निवडणूक होईल. या निवडणुकीसाठी भाजपने स्वतंत्र रणनीती अवलंबली. ‘ऑपरेशन लोटस’चा पर्याय सुरू केला. पण, त्यांच्या पदरी अपेक्षित यश येताना दिसत नाही. त्यातच भाजपचे नेतेही आमचाच अध्यक्ष होणार म्हणत असलेतरी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेचे सदस्य जाण्याच्या तयारीत नाहीत.भाजपने प्रयत्न करूनही सध्यातरी २८ च्यावर त्यांचे संख्याबळ जात नाही. तर राष्ट्रवादी २०, शिंदेसेना १५ आणि काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रत्येकी एक असे ३७ जणांचे पाठबळ भाजपच्या विरोधात आहे. तर सत्ता मिळविण्यासाठी ३३ जणांची आवश्यकता आहे. भाजपला आणखी पाच सदस्य जोडावे लागतील. तरच मिनी मंत्रालयावर झेंडा फडकविता येईल. पण, वास्तवात सध्यातरी तशी स्थिती दिसून येत नाही. यामुळे भाजपची घालमेल वाढल्याचे दिसून येत आहे.निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य टूरवर गेले आहेत. त्यानंतर शिंदेसेनेनेही सावध पवित्रा घेत सदस्यांसाठी पर्यटन घडवण्यास सुरुवात केली. मागील तीन आठवड्यापासून दोन्ही पक्षाचे सदस्य देशाच्या दक्षिण भागात आहेत. या सदस्यांवर दोन्हीही पक्षांचा बारीक वाॅच आहे. कोण काय बोलते, कोणाशी चर्चा करते, कोण काय हालचाली करत आहेत, याविषयी चांगले लक्ष ठेवले जात आहे.त्यातच टूरवर असलेल्या सदस्यांनी भाजपविरोधात ठाम भूमिका घेतल्याचे दिसते. निवडणुकीत भाजपविरोधात गेलो. लोकांत जाऊन मते मागितली. मग, आता त्यांच्याबरोबर जाऊन सत्ता स्थापन करणे योग्य नाही. जनाधाराचा आदर ठेवण्यासाठी आपण भाजपला सत्तेबाहेरच ठेवू अशी भूमिकाच त्यांनी घेतली आहे. त्यामुळे भाजपचे सत्तास्थापनेचे स्वप्न भंग होण्याची शक्यता अधिक पटीने वाढलेली आहे.

भाजपवरच उलटला गेम...भाजपने निवडणुकीपूर्वीच महायुती म्हणून एकत्र येण्याबाबत झुलवत ठेवले असा राष्ट्रवादी-शिंदेसेनेचा आरोप आहे. तसेच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आमचाच होणार हे जाहीर केले. निवडणुकीनंतरही बहुमत नसतानाही भाजपचाच अध्यक्ष आमचाच होणार हे नेत्यांनी सतत बोलून दाखविले आहे. त्यामुळे भाजपची ही रणनीती त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता वाढली आहे. यामध्ये वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातले तरच भाजपच्या हाताला सत्ता लागू शकते. नाहीतर सत्तेबाहेर राहून विरोधकांची भूमिका घ्यावी लागणार आहे.

विरोधात लढायचे; नंतर एकत्र, मग निवडणूक कशाला ?निवडणूक वेगवेगळी लढायची. जनतेचा काैल घ्यायचा. त्यानंतर सत्तेसाठी एकत्र यायचे. यातून जनमताचा अनादर झाला. मग, निवडणूक कशाला घ्यायची असे राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेतील सदस्य बोलून दाखवू लागले आहेत. आता जिल्हा परिषदेवर सत्ता आणूनच घरी आणि मतदारसंघात जाऊ, अशी भूमिकाही राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेच्या सदस्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara ZP: Rivals in Election, Rivals Now; BJP Alliance Unlikely!

Web Summary : Satara ZP election heats up. NCP and Shinde Sena refuse to align with BJP, citing pre-election opposition. BJP's 'go-it-alone' approach may backfire, hindering its chances of gaining power despite efforts.