शिडीवरून पडून माजी सैनिकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 10:18 IST2019-10-11T10:17:22+5:302019-10-11T10:18:08+5:30

शिडीवरून पडून संयज मारूती अहिरे (वय ४७, रा. नवीन औद्योगिक वसाहत, सातारा. मूळ रा. कडवे बुद्रुक, ता. पाटण) या माजी सैनिकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.

Former soldier dies after falling off a ladder | शिडीवरून पडून माजी सैनिकाचा मृत्यू

शिडीवरून पडून माजी सैनिकाचा मृत्यू

ठळक मुद्देशिडीवरून पडून माजी सैनिकाचा मृत्यूडोक्याला आणि हाताला लागला मार

सातारा : शिडीवरून पडून संयज मारूती अहिरे (वय ४७, रा. नवीन औद्योगिक वसाहत, सातारा. मूळ रा. कडवे बुद्रुक, ता. पाटण) या माजी सैनिकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माजी सैनिक संजय अहिरे हे नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये आपल्या कुटुंबीयांसह वास्तव करत होते. बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडत होता. यावेळी त्यांच्या घराच्या छतामधून पाणी येत होते. त्यामुळे ते आतूनच शिडीवरून चढून सिमेंट लावत होते.

त्यावेळी त्यांचा पाय घसरल्याने ते फरशीवर खाली पडले. त्यांच्या डोक्याला आणि हाताला मार लागला. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. पहाटेच्या सुमारास त्यांना अचानक त्रास होऊ लागला.

त्यामुळे त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. संजय अहिरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Former soldier dies after falling off a ladder