माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांना दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 17:50 IST2026-02-14T17:48:54+5:302026-02-14T17:50:12+5:30

कराड (जि. सातारा) : स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मारक समिती यांच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर सामाजिक ...

Former Chief Justice Bhushan Gavai awarded Dada Undalkar Social Award | माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांना दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जाहीर

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांना दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जाहीर

कराड (जि. सातारा) : स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मारक समिती यांच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार यावर्षी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती समितीचे विश्वस्त व जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

उदयसिंह पाटील म्हणाले की, स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या ५२ व्या स्मृतिदिनानिमित्त उंडाळे येथे बुधवार, दि. १८ रोजी होणाऱ्या ४३ व्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळाव्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ५१ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यावेळी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष व मेघालय उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती रणजीत मोरे, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रदीप देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Web Title : जस्टिस भूषण गवई को दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार

Web Summary : सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश जस्टिस भूषण गवई को दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार मिलेगा। 51,000 रुपये का पुरस्कार उंडाले में मराठी साहित्य सम्मेलन के अध्यक्ष विश्वास पाटिल द्वारा दिया जाएगा। सेवानिवृत्त न्यायाधीश रंजीत मोरे और प्रदीप देशमुख उपस्थित रहेंगे।

Web Title : Justice Bhushan Gavai Awarded Dada Undalkar Social Prize

Web Summary : Justice Bhushan Gavai, retired Chief Justice, will receive the Dada Undalkar Social Award. The award, including ₹51,000, will be presented at a ceremony in Undale on Wednesday by Vishwas Patil, President of the Marathi Literary Conference. Retired judges Ranjit More and Pradeep Deshmukh will attend.