जबरदस्तीने कारमधून नेऊन युवकाला केली मारहाण, आठ जणांविरोधात गुन्हा; साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 16:13 IST2022-03-25T16:13:17+5:302022-03-25T16:13:43+5:30
सातारा : सातारा शहरातून एका युवकाला जबरदस्तीने कारमधून बाहेर नेऊन लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आठ जणांविरोधात शाहूपुरी ...

जबरदस्तीने कारमधून नेऊन युवकाला केली मारहाण, आठ जणांविरोधात गुन्हा; साताऱ्यातील घटना
सातारा : सातारा शहरातून एका युवकाला जबरदस्तीने कारमधून बाहेर नेऊन लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आठ जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याप्रकरणी इस्माईल हमीदुल्ला खान (रा. निसर्ग कॉलनी, करंजे, सातारा) याने तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रारीनंतर जमीर शेख (रा. निसर्ग कॉलनी), अशफाक शेख (पूर्ण नाव, पत्ता नाही) तसेच अनोळी सहा जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी (दि. २३) रात्री पावणे नऊच्या सुमारास हा प्रकार घडला होता. संशयितांनी तक्रारदार युवकाला कारमधून जबरदस्तीने नेऊन सातारा तालुक्यातील कोंडवे, माळवाडी येथे लाकडी दांडके तसेच हाताने मारहाण केली होती. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली असून हवालदार भिंगारदेवे तपास करीत आहेत.