सातारा जिल्ह्यात ‘जीबीएस’चे पाच रुग्ण, प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 14:03 IST2025-02-01T14:03:16+5:302025-02-01T14:03:52+5:30
सातारा : सातारा जिल्ह्यात ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’चे पाच रुग्ण आढळून आले आहेत. यातील तीन रुग्ण हे १५ वर्षांखालील आहेत तर ...

सातारा जिल्ह्यात ‘जीबीएस’चे पाच रुग्ण, प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्वेक्षण
सातारा : सातारा जिल्ह्यात ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’चे पाच रुग्ण आढळून आले आहेत. यातील तीन रुग्ण हे १५ वर्षांखालील आहेत तर दोन रुग्ण ६५ वर्षांच्यावरील आहेत. या सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. महेश खलिपे यांनी स्पष्ट केले.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे नमूद केले आहे. जिल्ह्यात आढळून आलेल्या पाचपैकी एका रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालयात तर अन्य चार रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खासगी रुग्णालयांना संपर्क साधून अशा प्रकारचे रुग्ण आढळल्यास जवळच्या आरोग्य संस्थेची संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्वेक्षण करण्यात येत असून, सतर्क राहून नवीन रुग्ण निदान होणाऱ्या भागात त्वरित सर्वेक्षण करण्यात येत आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या संशयित रुग्णाचे रक्त, लघवी वा शाैच नमुने एनआयव्ही पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
‘जीबीएस’चा आजार हा दूषित अन्न किंवा पाणी या माध्यमातून होऊ शकतो. त्यामुळे पाणीपुरवठ्याची तपासणी करून आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्यात येत आहेत. हा आजार अचानक उद्भवतो आणि चार आठवड्यांपर्यंत वाढतो. त्यामुळे नागरिकांनी उपचारास विलंब टाळावा. -डाॅ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी