पाटण तालुक्यात साडेपाच हजार लोक कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST2021-06-16T04:51:47+5:302021-06-16T04:51:47+5:30

रामापूर : पाटण तालुक्यात सोमवारी कोरोना अहवालात नव्याने २५ बाधित तर २९ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. आत्तापर्यंत ...

Five and a half thousand people in Patan taluka are free from corona | पाटण तालुक्यात साडेपाच हजार लोक कोरोनामुक्त

पाटण तालुक्यात साडेपाच हजार लोक कोरोनामुक्त

रामापूर : पाटण तालुक्यात सोमवारी कोरोना अहवालात नव्याने २५ बाधित तर २९ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. आत्तापर्यंत तालुक्यात एकूण ६१८४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ५४९० व्यक्तींनी कोरोनावर मात केली. कोरोनामुळे आत्तापर्यंत एकूण २६७ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. आर. बी. पाटील यांनी दिली.

रविवारी संध्याकाळी पाच ते सोमवारी संध्याकाळी पाच वाजता या चोवीस तासांत आलेल्या वैद्यकीय अहवालात तालुक्यातील २५ व्यक्तींचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने त्यांचेवर तातडीने पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. यात पाटण, वाडीकोतावडे, नुने, शिंदेवाडी, कदमवाडी, ढेबेवाडी, काढणे, पापर्डे, मारूल हवेली, मरळी आदी गावांतील २५ रुग्णांचा समावेश आहे.

यापैकी काहींवर पाटण येथील समाजकल्याण विभागाचे नूतन वसतिगृह व ढेबेवाडी, मरळी कोरोना केअर सेंटर तर काहींवर कऱ्हाड, सातारा आदी शहरातील खासगी रुग्णालयात व बहुतांशी बाधितांवर गावपातळीवर संस्थात्मक विलगीकरण व गृहविलगीकरण करून तेथे पुढील उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत तालुक्यात कोरोनामुळे एकूण २६७ व्यक्तींचा मृत्यू झाला. नव्याने २९ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. आत्तापर्यंत तालुक्यात एकूण ६१८४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी तब्बल ५४९० व्यक्तींनी कोरोनावर मात केली असल्याचेही श्रीरंग तांबे व डाॅ. आर. बी. पाटील यांनी सांगितले.

Web Title: Five and a half thousand people in Patan taluka are free from corona