डोंगरातील वणवा कुसुंबी गावापर्यंत पसरून घराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 12:52 IST2019-03-14T12:52:09+5:302019-03-14T12:52:56+5:30
सायगाव : जावळीत समाजकंटकांकडून डोंगरांना आगी लावण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, अशा समाजकंटकांवर अंकुश ठेवण्यात वनविभागाचे अधिकारी अपयशी ठरत ...

डोंगरातील वणवा कुसुंबी गावापर्यंत पसरून घराला आग
सायगाव : जावळीत समाजकंटकांकडून डोंगरांना आगी लावण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, अशा समाजकंटकांवर अंकुश ठेवण्यात वनविभागाचे अधिकारी अपयशी ठरत आहेत.
दोन दिवसांपूर्वी कुसुंबी गावच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगराला अज्ञात व्यक्तीने आग लावली होती. या आगीत शेकडो हेक्टर क्षेत्र जळण्याबरोबरच वन विभागाच्या दुर्लक्षाने हा वणवा गावापर्यंत येऊन येथील शिवराम चिकणे यांच्या घराला आग लागून घराचे नुकसान झाले.
यामध्ये घराच्या पाठीमागील भिंत व छपराने पेट घेतला. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. दरम्यान, गाव कामगार तलाठी धर्मा अंबवणे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, वीस ते पंचवीस हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.