लग्नास नकार दिल्याने युवतीचे अश्लील फोटो अपलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 17:28 IST2019-06-11T17:26:02+5:302019-06-11T17:28:13+5:30

लग्नास नकार दिल्याने एका २६ वर्षीय युवतीचे सोशल मीडियावर अश्लील फोटो अपलोड केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, संबंधित युवकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Filing pornographic photos of the young couple refusing marriage | लग्नास नकार दिल्याने युवतीचे अश्लील फोटो अपलोड

लग्नास नकार दिल्याने युवतीचे अश्लील फोटो अपलोड

ठळक मुद्देलग्नास नकार दिल्याने युवतीचे अश्लील फोटो अपलोडयुवतीची पोलीस ठाण्यात धाव : आरोपीला अटक करण्यासाठी पथक रवाना

सातारा : लग्नास नकार दिल्याने एका २६ वर्षीय युवतीचे सोशल मीडियावर अश्लील फोटो अपलोड केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, संबंधित युवकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद भिकन पाटील (वय २६, रा. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित पीडित युवती सातारा तालुक्यातील एका गावात राहते. विनोद पाटील याच्यासोबत तिची पुणे येथे ओळख झाली. त्यावेळी पाटील याने संबंधित युवतीला लग्नाची मागणी घातली. मात्र, संबंधित युवतीने लग्नास स्पष्ट नकार दिला.

हे सहन न झाल्याने विनोद पाटील याने सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार केले. त्यामध्ये युवतीचे अश्लील फोटो अपलोड केले. एवढ्यावरच न थांबता त्याने पीडित युवतीची बहीण आणि नातेवाईकांनाही फ्रेंन्ड रिक्वेस्ट पाठवून मेसेज केले.

हा प्रकार युवतीच्या लक्षात आल्यानंतर तिने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, आरोपीला अटक करण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Filing pornographic photos of the young couple refusing marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.