उदयनराजे भोसले अन् शिवेंद्रसिंहराजे यांच्या समर्थकांमध्ये राडा; नगरसेवकासह ५ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 13:26 IST2021-09-09T13:09:05+5:302021-09-09T13:26:57+5:30
या प्रकरणी नगरसेवक बाळू खंदारेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध दरोडा, खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदयनराजे भोसले अन् शिवेंद्रसिंहराजे यांच्या समर्थकांमध्ये राडा; नगरसेवकासह ५ जणांवर गुन्हा दाखल
सातारा : साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये बुधवारी रात्री नऊच्या सुमारास रविवार पेठेत जोरदार सशस्त्र राडा झाला.
या प्रकरणी नगरसेवक बाळू खंदारेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध दरोडा, खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सशस्त्र हाणामारीत पाचजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर सातारा शहरात तणावाचे वातावरण होते. जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात युवकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी जमावाला पांगविल्यानंतर तणाव निवळला.