शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

माण बाजार समितीत गोरे बंधूंना ‘फिफ्टी-फिफ्टी’

By admin | Updated: August 20, 2015 23:01 IST

सर्वसाधारण सात जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात होते.

दहिवडी : माण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सतरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आमदार जयकुमार गोेरे यांच्या गटाचे नऊ, तर शेखर गोरे यांच्या गटाचे आठ उमेदवार विजयी झाले. हमाल व तोलाईमधील एक जागा शेखर गोरे यांनी यापूर्वी बिनविरोध केल्याने दोन्ही गटांना समान जागा मिळाल्या आहेत. कृषी प्रक्रिया गटाची जागा रिक्त आहे.माण बाजार समितीसाठी बुधवारी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी गुरुवारी दहिवडीत झाली. सुरुवातीस व्यापारी मतदारसंघाची मतमोजणी केली. यामध्ये शेखर गोरे यांच्या पॅनेलमधील विजय पोळ, कैलास मोरे हे विजयी झाले. ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण संघातून दादासाहेब चोपडे, तानाजी मगर हे विजयी झाले. ग्रामपंचायतीच्या इतर मागास प्रवर्गात दादासाहेब पुकळे विजयी झाले. मागासवर्गीय मतदारसंघात महादेव अवघडे विजयी झाले. हे सर्व शेखर गोरे यांच्या पॅनेलमधील उमदेवार आहेत.सोसायटी मतदारसंघात चुरस पाहायला मिळाली. यामध्ये सर्वसाधारण सात जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये आमदार जयकुमार गोरे गटाला पाच, तर शेखर गोरे यांच्या गटाला दोन जागा मिळाल्या. यामध्ये आमदार गोरे पॅनेलचे विजयी उमेदवार असे : विजय ओंबासे, चंद्रसेन काटकर, विठ्ठल गायकवाड, संजय जगताप, बाळकृष्ण जगदाळे. तर शेखर गोरे यांच्या पॅनेलमधून दादासाहेब जाधव, बाळासाहेब पवार विजयी झाले. महिला राखीव मतदार संघातून आमदार गोरे यांच्या पॅनेलच्या शोभा काळेल, प्रभावती जगदाळे विजयी झाल्या. नागरिकांच्या इतर मागास प्रवर्गातून आमदार गोरे गटाचे अरुण गोरे, विमुक्त जाती भटक्या जमातीमधून आमदार गोरे गटाचे चंद्रकांत दडस हे विजयी झाले. आमदार गोरे यांना सोसायटीमधील नऊ जागा, तर शेखर गोरे यांच्या पॅनेलला तोलाईमधील एक, व्यापारीमधील दोन, ग्रामपंचायतीतील चार, सोसायटीमधील दोन अशा जागा मिळाल्या. (प्रतिनिधी)ंविद्यमान संचालकाचा पराभवया निवडणुकीत विद्यमान संचालक शेखर गांधी यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचा पराभव नवखे उमेदवार विजय पोळ यांनी ११४ मतांनी केला. तर पंचायत समितीचे माजी सभापती रामचंद्र बापूसाहेब माने यांना दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. दादासाहेब जाधव यांना बाजार समितीत दुसऱ्यांना संधी मिळाली आहे.