शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

मारामारीप्रकरणी चाळीस जणांवर गुन्हा

By admin | Updated: August 28, 2015 22:39 IST

शेणोलीत तणावपूर्ण शांतता : आरोपींची धरपकड सुरू; गंभीर जखमींवर उपचार

कऱ्हाड : शेणोली, ता. कऱ्हाड येथे सरपंच निवडीच्या कारणावरून उडालेल्या धुमश्चक्रीप्रकरणी कऱ्हाड तालुका पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. त्यानुसार दोन्ही गटांतील एकूण ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू आहे. दरम्यान, धुमश्चक्रीत झालेला तलवारी हल्ला व हॉकी स्टिक, गजाने केलेल्या मारहाणीत एकूण अकराजण जखमी झाले आहेत. त्यापैकी पाचजणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत अमोल नामदेव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नारायण शिंगाडे, सर्जेराव भीमराव शिंगाडे, राजेश शिंगाडे, सागर शिंगाडे, बाजीराव शिंगाडे, अनिल शिंगाडे, विश्वास शिंगाडे, विजय शिंगाडे, राजेंद्र शिंगाडे, अंकुश शिंगाडे, श्रीरंग शिंगाडे, संदीप शिंगाडे, गणेश माने, अर्जुन माने, अशोक नलवडे, बाबा नलवडे, सचिन काशीद (सर्व रा. शेणोली) यांच्यासह अन्य दहा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सरपंच निवडीच्या कारणावरून गुरुवारी सहा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी तलवार, लोखंडी गज व दगडाने मारहाण केली. त्यामध्ये अमोल पाटील यांच्यासह प्रमोद कणसे, दयानंद पाटील, मोहन कणसे हे जखमी झाले.याउलट रवींद्र अर्जुन इटकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमोल नामदेव पाटील, प्रताप पोपटराव कणसे, संदीप हिंदुराव पाटील, प्रमोद बाळासाहेब कणसे, सचिन पाटील, दयानंद बाजीराव पाटील, लालासाहेब पाटील, प्रशांत विजय पाटील, विजय यशवंत पाटील, शहाजी कृष्णा पाटील, सुहास हणमंत पाटील, मोहन भीमराव कणसे (सर्व रा. शेणोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा राग मनात धरून गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी तलवार, हॉकी स्टिक, लोखंडी गजाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत नारायण भीमराव शिंगाडे, सर्जेराव भीमराव शिंगाडे, सागर प्रकाश शिंगाडे, हणमंत सर्जेराव शिंगाडे, सतीश सर्जेराव शिंगाडे, राजेंद्र शंकरराव शिंगाडे, श्रीरंग बंडू शिंगाडे हे जखमी झाले आहेत. याबाबतची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)वाहनांचे नुकसान; पोलीस बंदोबस्त मारामारीनंतर दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली. यामध्ये दोन्ही गटांतील वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसान झालेल्या वाहनांमध्ये दोन टेम्पो, एक कार, दुचाकी तसेच एका कार्यालयाचा समावेश आहे. शेणोली येथे गुरुवारी झालेल्या मारामारीच्या घटनेनंतर अद्यापही तणाव आहे. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर व पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी दिवसभर पोलीस परिसरात आरोपींची धरपकड करीत होते.