शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंच्या धक्कातंत्राची साताऱ्यातील मातब्बरांना धास्ती; उपनगराध्यक्ष निवडीनंतर आता सभापती पदाकडे नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 19:34 IST

अपक्षांना संधी मिळणार?

सातारा : सातारा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष निवडीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी अनपेक्षित खेळी खेळत जे धक्कातंत्र अवलंबले, त्याचे पडसाद अद्याप शांत झालेले नाहीत; तोच विषय समित्यांच्या सभापती निवडीचा धुरळा उडू लागला आहे. या मानाच्या खुर्च्यांवर विराजमान होण्यासाठी इच्छुकांनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली असून, साताऱ्याच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा लॉबिंगला उधाण आले आहे.नगरपालिकेत खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही नेत्यांचा शब्द अंतिम असतो. मात्र, सध्या ४१ नगरसेवकांपैकी बहुतांश चेहरे नवे असल्याने ‘नव्यांना संधी की जुन्यांना प्राधान्य’ असा पेच नेत्यांसमोर आहे. गटनेतेपदी अविनाश कदम आणि प्रतोदपदी निशांत पाटील यांची वर्णी लावून नेत्यांनी समतोल साधण्याचा प्रयत्न केला असला, तरी सभापतिपदाच्या सहा जागांसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. सभापतिपदातही समसमान फॉर्म्युला ठरण्याची शक्यता असली तरी, ऐनवेळी कोणाची लॉटरी लागणार यावरून कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.अपक्षांना संधी मिळणार?उपनगराध्यक्ष निवडीत ज्याप्रमाणे धक्कातंत्र पाहायला मिळाले, तसेच सभापती निवडीतही घडणार की नवीन चेहऱ्याला संधी देऊन प्रस्थापितांना धक्का दिला जाणार? या प्रश्नांनी सध्या इच्छुकांच्या छातीत धडधड वाढवली आहे. आरोग्य, पाणीपुरवठा, नियोजन, शिक्षण, महिला व बालकल्याण आणि मागासवर्गीय कल्याण या समित्यांच्या निवडीची प्रक्रिया या आठवड्यात पूर्ण होण्याची चिन्हे आहेत...तरच शहर विकासाच्या गाडीला गतीगेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीत शहराचा कारभार सुरू होतो. आता लोकनियुक्त कार्यकारिणी अस्तित्वात आली असली तरी शहर विकासासाठी ‘स्थायी समिती’ सक्रिय असणे अनिवार्य आहे. सभापती निवडीनंतर पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींच्या हातात येतील. त्यामुळे सभापतिपदी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Udayanraje's strategy unsettles Satara leaders; eyes now on committee chairmanships.

Web Summary : Udayanraje Bhosale's unexpected move in Satara municipality's deputy mayor election has stirred unease. Attention now shifts to committee chair elections, sparking intense lobbying amidst uncertainty over new versus experienced candidates.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले