शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

Satara: दत्तक देण्यावरून वाद, बापानेच दोन महिन्यांच्या मुलाची विष पाजून हत्या केली; न्यायालयाने जन्मठेप सुनावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 14:10 IST

वडूज : दत्तक देण्याच्या कारणावरून मुलगा वेदांत (वय दोन महिने) याची विषारी औषध पाजून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी ...

वडूज : दत्तक देण्याच्या कारणावरून मुलगा वेदांत (वय दोन महिने) याची विषारी औषध पाजून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी दहिवडी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रणजीत सुरेश बुलूंगे (वय ३३ रा. सुरूर, ता. वाई) असे जन्मठेप झालेल्या बापाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रणजीत सुरेश बुलूंगे याने २० जानेवारी २०१८ रोजी त्याचा मुलगा वेदांत यास दत्तक देण्याबाबत पत्नीच्या माहेरकडील लोकांना म्हणत होता. परंतु त्यांनी त्यास दत्तक देण्यास विरोध केला. यामुळे त्याने २० जानेवारी २०१८ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मुलाचे टॉनिकचे बाटलीत विषारी औषध मिसळून पाजले. यामध्ये वेदांतला त्रास होऊ लागला. यास उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, मात्र त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.मुलगा वेदांत याचा विषारी औषध पाजून खून केल्याप्रकरणी रणजीत सुरेश बुलूंगे याच्या विरोधात दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदवले. तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले. कसून तपास करून आरोपींविरुद्ध वडूजच्या जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील वैभव हरीश काटकर यांनी काम पाहिले. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अकरा साक्षीदार तपासण्यात आले.साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपीला दोषी ठरवून रणजीत सुरेश बुलूंगे याला जन्मठेप व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.हा खटला चालवणे कामी उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रॉसिक्युशन स्क्वाडचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, महिला पोलिस हवालदार विजयालक्ष्मी दडस, पोलिस कॉन्स्टेबल सागर सजगणे, पोलिस कॉन्स्टेबल जयवंत शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल अमीर शिकलगार यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस