टीव्ही बंद केल्याच्या कारणावरून पत्नी-मुलाकडून वडिलांचा खून, साताऱ्यातील दिवड येथील घटना

By प्रशांत कोळी | Updated: November 14, 2022 15:51 IST2022-11-14T15:40:45+5:302022-11-14T15:51:47+5:30

नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

Father killed by wife-son for turning off TV in satara district | टीव्ही बंद केल्याच्या कारणावरून पत्नी-मुलाकडून वडिलांचा खून, साताऱ्यातील दिवड येथील घटना

टीव्ही बंद केल्याच्या कारणावरून पत्नी-मुलाकडून वडिलांचा खून, साताऱ्यातील दिवड येथील घटना

सचिन मंगरुळे

म्हसवड : घरात सुरू असलेला टीव्ही बंद केल्याच्या कारणावरून पत्नी व मुलाने वडिलांना कळकाच्या काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा खून केला. किसन नारायण सावंत (वय ५०, रा. दिवड, ता. माण, जि. सातारा) असे खून झालेल्याचे नाव आहे. ही घटना दिवड, ता. माण येथे घडली

याबाबत म्हसवड पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दिवड, ता. माण येथे किसन नारायण सावंत आपल्या कुटुंबासह राहत होते. १ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास किसन सावंत हे बाहेरून घरी आले. मुलगा व बायको मोबाइल पाहत होते; पण घरातील टीव्ही तसाच चालू होता.

तो कोणीही पाहत नाही, म्हटल्यावर त्यांनी तो बंद केला. टीव्ही का बंद केला म्हणून पत्नी उषा किसन सावंत, मोठा मुलगा आदित्य किसन सावंत या दोघांनी आपापसात संगनमत करून घरातील कळकाची दांडकी घेऊन त्यांच्या डोक्यात मारले. संपूर्ण अंगावर तसेच त्यांच्या छातीवर, पोटावर लाथाबुक्क्यांनी त्यांनी मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले होते.

त्यानंतर त्यांना नातेवाईकांनी प्रथम पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना ससून हॉस्पिटल पुणे येथे दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार सुरु असतानाच शनिवारी (दि.१२) त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Father killed by wife-son for turning off TV in satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.