Satara Crime: वडिलांचा खून करून मृतदेहाची लावली विल्हेवाट, कोपर्डे हवेलीत खळबळ

By संजय पाटील | Updated: April 20, 2023 13:07 IST2023-04-20T13:02:04+5:302023-04-20T13:07:29+5:30

मुलाला कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले

Father killed and disposed of dead body, excitement in Koparde Haveli Satara district | Satara Crime: वडिलांचा खून करून मृतदेहाची लावली विल्हेवाट, कोपर्डे हवेलीत खळबळ

Satara Crime: वडिलांचा खून करून मृतदेहाची लावली विल्हेवाट, कोपर्डे हवेलीत खळबळ

कराड : वडिलांना लाकडे दांडक्याने मारहाण करून त्यांचा खून केला. त्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथे मंगळवारी (दि.१८) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडलेली ही घटना आज, गुरुवारी (दि.२०) दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी कराड तालुका पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे.  

तानाजी लक्ष्मण होवाळ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अभिजीत उर्फ पप्प्या तानाजी होवाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोपर्डे हवेली येथील एकाचा खून करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती कराड तालुका पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी अभिजीत होवळ याने लाकडी दांडक्याने मारहाण करून वडील तानाजी होवाळ यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. 

त्यानुसार पोलिसांनी अभिजीतला ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री त्याने हा खून केल्याचे समोर आले आहे. मात्र खुनाच्या कारणाचा पोलिस शोध घेत आहेत. तसेच मृतदेहाची परस्पर विल्हेवाट कशी लावली, त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Web Title: Father killed and disposed of dead body, excitement in Koparde Haveli Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.