शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अधिसूचना रद्द होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST

वडूज : खटाव तालुक्यातील मायणी पक्षी संवर्धन राखीव क्षेत्रामधून समूह क्र. २ मधील येरळवाडी तलावाचा समावेश विरोधी ...

वडूज : खटाव तालुक्यातील मायणी पक्षी संवर्धन राखीव क्षेत्रामधून समूह क्र. २ मधील येरळवाडी तलावाचा समावेश विरोधी आमरण उपोषण सुरू असून अधिसूचना रद्द होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याच्या मताशी आंदोलनकर्ते ठाम राहिल्याने प्रशासनाची घोर निराशा झाली. अखेर प्रशासन आणि येरळवाडी बचाव समिती यांच्यातली बैठक निष्फळ ठरली.

मायणी पक्षी संवर्धन राखीव मधून येरळवाडी तलाव रद्द करावा, यासाठी बनपुरी, ता. खटाव येथील भवानीमाता मंदिरात बसलेल्या उपोषणकर्त्यांशी चर्चा करताना प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे व वनक्षेत्रपाल शितल फुंदे यांसह विविध गावांतील शेतकरीही उपस्थित होते.

मायणी पक्षी संवर्धन राखीव समूह क्रमांक दोनमध्ये येरळवाडी तलाव समाविष्ट कसा झाला, याची माहिती मिळावी, अशी मागणी येरळवाडी बचाव समितीने केली असता वनविभागाचे अधिकारी यांची काही काळ तारांबळ उडाली. तर ३५० उपसा सिंचन योजना आणि नळ पाणीपुरवठा योजना, गाळपेर, मासेमारी आणि पशुधन यांचे हक्क कायमस्वरूपी अबाधित ठेवण्यासाठी जारी करण्यात आलेली अधिसूचना रद्द झाली पाहिजे, अशी एकमुखी मागणी आंदोलनकर्त्यांमधून यावेळी करण्यात आली. अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी स्थानिक लोक व शेतकरी वर्ग अधिसूचना विरोधी पेटून उठले आहेत. सदरचे आंदोलन म्हणजे लोकांचे मूलभूत अधिकार व हक्क अबाधित राखण्याचा लढा उभारला आहे. त्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी आमरण उपोषण सुरू ठेवण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही, असे मत ही आंदोलनकर्त्यांमधून व्यक्त करण्यात आले. या आंदोलनात बाळासाहेब पोळ, नाना पुजारी, नवनाथ पोळ, बाबासाहेब बागल, हणमंत देशमुख, विजय बागल, बापूराव देवकर, गोपीनाथ शिंदे, विजय देवकर, लक्ष्मण काळे, सोमनाथ पाटील, शंकर देवकर, मोहन बागल, हणमंत इनामदार आदी शेतकरी उपोषणाला बसले आहेत. तर अंबवडे, येरळवाडी, बनपुरी, नढवळ गावच्या शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी जाऊन पाठिंबा जाहीर केला. प्रशासन व आंदोलनकर्ते यांच्यातील चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली असली तरी बुधवार दि.१६ रोजी दुपारी बारा वाजता चर्चेची दुसरी फेरी होणार आहे.

दरम्यान, हरणाई उद्योग समूहाचे विश्वस्त मोहनभाऊ देशमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य नंदकुमार मोरे, माजी सभापती संदीप मांडवे, नगरसेवक शहाजीराजे गोडसे, उपसरपंच विजय शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पाटील आदींसह खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने या उपोषणाला आंदोलनस्थळी जाऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला.

फोटो: मायणी पक्षी संवर्धन राखीव मधून मधून येरळवाडी तलाव रद्द करावा यासाठी बनपुरी ता. खटाव येथील भवानीमाता मंदिरात बसलेले उपोषणकर्त्यांशी प्रांताधिकारी जर्नादन कासार यांनी चर्चा केली. (शेखर जाधव )

फोटो नेम : १५वडूज