शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

गव्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

By admin | Updated: November 26, 2015 23:55 IST

महाबळेश्वरजवळ घटना : संतप्त ग्रामस्थांची वन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

महाबळेश्वर : येथून बारा किलोमीटर अंतरावरील देवाळीमुऱ्हा गावाजवळ रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार झाला. या घटनेनंतर संतप्त झालेले ग्रामस्थ पंचनाम्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेले आणि त्यांना धक्काबुक्की केली, तसेच सरकारी गाडी उलथवून टाकण्यात आली. अख्तर कादर शारवान (वय ४३) असे गव्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. गुरुवारी (दि. २६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अख्तर कादर शारवान हे गुरुवारी सायंकाळी त्यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेतात काम करीत होते. यावेळी त्यांच्यावर रानगव्याने अचानक हल्ला चढविला. हल्ल्यात शारवान यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजल्यावर नातेवाइकांसह स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली. दरम्यान, ही माहिती वनखात्याला समजल्यावर या विभागाचे कर्मचारी अधिक माहिती घेण्यासाठी तसेच पंचनाम्यासाठी गावात गेले. मात्र, या घटनेमुळे संतप्त झालेले ग्रामस्थ कर्मचाऱ्यांवर धावून गेले. सरकारी गाडी उलथवून टाकण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून वाई, महाबळेश्वर पोलीस तत्काळ घटनास्थळी धावून आले. त्यांनी ग्रामस्थांना समजावून वन कर्मचाऱ्यांची सुटका केली. शारवान यांंचा मृतदेह विच्छेदनासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणला. (प्रतिनिधी)उपद्रवाने ग्रामस्थ त्रस्तग्रामस्थांनी रानगव्यांच्या उपद्रवाबाबत वनविभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. रानगव्यांचे कळप स्ट्रॉबेरी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असून, गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेकदा झाली आहे. या मागणीकडे वनविभागाने दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, आता गव्याने शेतकऱ्यावरच हल्ला केल्याने त्यांचा संताप अनावर झाला. ‘आणखी किती शेतकऱ्यांचे बळी जाणार,’ अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.