शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

अमोलच्या वर्दीसाठी कुटुंबीयांचा संघर्ष! दोन वर्षांपासून कुटुंबाचा लढा : अपघातानंतर कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:44 IST

अजय जाधव ।उंब्रज : नुकत्याचकर्तव्य बजावत असताना वाहनाने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेले पोलीस कर्मचारी कोमात गेले. त्यानंतर गत दोन वर्षांपासून त्यांना पुन्हा वर्दीत पाहण्यासाठी आणि स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाची धडपड सुरू आहे. मात्र, या प्रयत्नांना यश येत असतानाच कुटुंब आर्थिक गर्तेत सापडले असून, वर्दीतल्या या युवकाच्या उपचारासाठी ...

ठळक मुद्दे; प्रकृतीत सुधारणा; आर्थिक मदतीची गरज

अजय जाधव ।उंब्रज : नुकत्याचकर्तव्य बजावत असताना वाहनाने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेले पोलीस कर्मचारी कोमात गेले. त्यानंतर गत दोन वर्षांपासून त्यांना पुन्हा वर्दीत पाहण्यासाठी आणि स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाची धडपड सुरू आहे. मात्र, या प्रयत्नांना यश येत असतानाच कुटुंब आर्थिक गर्तेत सापडले असून, वर्दीतल्या या युवकाच्या उपचारासाठी सध्या आर्थिक हातभाराची गरज आहे.

सातारा तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यास असताना पोलीस कर्मचारी अमोल अंकुश कांबळे यांचा अपघात १४ सप्टेंबर २०१६ रोजी झाला. साताऱ्यानजीक रायगाव फाटा येथे हा अपघात झाला. अमोल हे आपल्या सहकाºयांसह कर्तव्य बजावण्यासाठी तेथे गेले होते. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या एका गाडीने त्यांना चिरडले. यामध्ये पोलीस कर्मचारी नितीन जमदाडे ठार झाले तर अमोल कांबळे व पोलीस होमगार्ड गजेंद्र बोरडे हे गंभीर जखमी झाले. अमोल यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर अमोल हे सुमारे एक महिना कोमात होते. नंतर शुद्धीवर आले. वर्षभर ते फक्त जीवन मरणाची लढाई लढत होते. वर्षांनतर त्यांनी डोळे उघडले. आता ते आलेल्या लोकांना ओळखू लागलेत. आधारावर उभे राहू लागलेत. बोलता मात्र अजूनही येत नाही. परंतु त्याच्या तब्येतीमध्ये सकारात्मक बदल घडू लागले आहेत.

अपघातानंतर दवाखान्याचा खर्च पोलीस दलाच्या वतीने करण्यात आला. त्यानंतरच्या औषधांचा खर्च सातारा जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान हे कुटुंब अपघातानंतर एक वर्ष सातारा येथे राहत होते. तेथील खर्च अमोलचे चुलत बंधू प्रकाश कांबळे यांनी केला. त्यानंतर अमोलसह त्याचे कुटुंबीय आपल्या मूळगावी मसूर येथे मुक्कामी आले आहे.

अमोल यांची प्रकृती सुधारत असताना कुटुंबाचे अर्थकारण मात्र पूर्णपणे कोलमडून पडले आहे. वडिलांनी रोजगार सोडून अमोलच्या सेवेसाठी पूर्ण वेळ दिला आहे. धाकटा भाऊ अतुल याने अकरावीमधून शिक्षण बंद केले आहे. हॉटेलमध्ये वेटर म्हणून तो काम करत आहे. सध्या अमोल यांना महिन्यातून एकदा पुणे येथे उपचारासाठी न्यावे लागते. दवाखान्याचा खर्च, प्रवास खर्च याला वीस हजार रुपये लागत आहेत. दर महिन्याला स्वत:च्या रोजीरोटीच्या खर्चाचा ताळमेळ जुळवणे अवघड असलेल्या कांबळे कुटुंबाला दर महिन्याला वीस हजार रुपये जमा करणे अवघड बनत आहे.दोन वर्षांपासून कुटुंबाचा अमोलसाठी लढादोन महिने कोमात गेलेला अमोल. त्यानंतर फक्त शुद्धीवर आलेला अमोल. वर्षभरानंतर डोळे उघडणारा अमोल आणि आता आधाराने उभा राहू लागलेला अमोल हे सर्व सकारात्मक आहे. अमोल सध्या आधाराने बसतात. थोडे चालतात. यासाठी अमोल यांचे कुटुंबीय सकाळी सहा वाजल्यापासून अमोल यांच्यासाठी धडपड सुरू करत आहेत. अजूनही अमोल बोलत नाहीत; पण बोलण्याचा प्रयत्न करतायत. अमोल यांना पूर्ण बरे होण्यासाठी अजून किती वर्षे लागतील, हे सांगता येत नाही. वडील, आई, भाऊ, बहीण यांची त्याला बरे करण्याची चिकाटी मात्र तसूभरही कमी झाली नाही. 

अमोल यांनी बोलक्या स्वभावामुळे असंख्य मित्र जोडले. मात्र, गेली दोन वर्षे तेच अबोल आहेत. वर्षभरापासून ते लोकांना ओळखतायत. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या लोकांचे अश्रू आणि त्यांना पाहून अमोल यांच्या डोळ्यातून येणारे अश्रू खूप काही सांगून जातात. आमचे काळीज फाटते; पण खचायचे नाही, हे आम्ही ठरवले आहे. काहीही झाले तरी या संकटावर एक दिवस आम्ही मात करणार. यासाठी मात्र आर्थिक मदतीची साथ मिळण्याची नितांत गरज आहे.- कमल कांबळे, आई

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातPoliceपोलिस