शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
3
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
4
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
5
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
6
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
7
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
8
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
9
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
10
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
11
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
12
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
13
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
14
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
16
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
17
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
18
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
19
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
20
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले

कुटुंब रंगलंय मोबाईल विश्वात! बडबड गीते, पाककला, करिअर व्हाया बिझनेस अन् फॅटबर्न अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:02 IST

सातारा : घड्याळ, रेडिओ, टीव्ही इतकंच काय आजीबाईचा बटवाही आपल्यात सामावून घेतलेल्या इटुकल्या पिटुकल्या मोबाईलचं याड आता अवघ्या कुटुंबाला लागलं आहे.

ठळक मुद्देसगळ्यांसाठी सगळं काही :

सातारा : घड्याळ, रेडिओ, टीव्ही इतकंच काय आजीबाईचा बटवाही आपल्यात सामावून घेतलेल्या इटुकल्या पिटुकल्या मोबाईलचं याड आता अवघ्या कुटुंबाला लागलं आहे. चिमुरड्यांना गोष्टी, गृहिणींना झटपट रेसिपी, तरुणाईला स्टाईल अन् करिअर, तर पुरुषांना अवघी कामं एका क्लिकवर, वयस्कांना पौराणिक कथा असं सगळं एका क्लिकवर मिळत असल्यामुळे सध्या कुटुंब रंगलंय मोबाईलमध्ये, असंच चित्र घराघरांत दिसत आहे.मोबाईल वापराविषयी अनेक वाद-प्रतिवाद असले तरीही मोबाईलच्या येण्यानं बरेच बदल होत गेले. शाळेत जाणाऱ्या मुलांना अवघड वाटणारे गणित चुटकीसरशी सोडवणाºया शेकडो पद्धती आता इंटरनेटच्या महाजालात आहेत. आजी-आजोबांच्या धम्माल गोष्टी सचित्र उपलब्ध असल्याने त्या लक्षात ठेवणं मुलांना सोपं जातंय. हीच अवस्था तरुणाईची आहे. करिअरच्या शेकडो संधी आणि तिथपर्यंत जाण्याचा मार्ग याचा उहापोह येथे मोठ्या पद्धतीवर पाहायला मिळतो. तरुणाईने स्वत:ला सकारात्मक ऊर्जेने कसे भरून घ्यावे, याचेही मार्गदर्शन करणारे छोटे-छोटे व्हिडीओ पाहायला मिळतात. आर्थिक मर्यादांमुळे ज्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता येत नाही, अशा महिलांसाठी आॅनलाईन शॉपिंग वेबसाईट वरदान ठरत आहे. मोठ्या शहरांमध्ये बसणारे व्यावसायिक उत्पादनाचे फोटो काढून किमती पाठवतात. त्याच पुढे पाठवून महिला चांगलं अर्थार्जन करत आहेत. पुरुषांनाही बिल भरणं, तिकीट बुक करणं, मेल चेक करणं हे सगळं आता सहज शक्य झाले आहे. मोबाईल वापरात घरातील ज्येष्ठही मागे नाहीत. पौराणिक कथा, भक्ती संगीत व ुदुर स्थायिक झालेल्या कुटुंबीयांशी संपर्कासाठी मोबाईलचा वापरतात.चिमुरड्यांचा जोर यू-ट्यूबवरघरात काही महत्त्वाचं बोलणं सुरू असेल किंवा घर शांत ठेवायचं असेल तर चिमुरड्यांच्या हाती मोबाईल हा फंडा सर्रास पाहायला मिळतो. मुलांच्या हाती मोबाईल आल्यावर यू-ट्यूबवर जाऊन बडबड गीते, कविता, गोष्टी, क्ले मेकिंग, फाय मिनिटस क्राफ्ट अशा गोष्टी पाहिल्या जातात. यातून मुलांची करमणूकही होते आणि त्यांच्या कानावर विविध गोष्टी आणि शाळेतील गीतेही पडतात. त्यामुळे करमणूक आणि अभ्यास असा दुहेरी फायदा होतो.घरगुती नुस्खे, उद्योग अन् बरचं!घरातील काम अन् नोकरीची व्यवधाने सांभाळून मोबाईल हातात आल्यानंतर कुटुंबीयांशी संपर्क साधायला, वेगवेगळ्या ग्रुपवर असलेल्या नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींशी संवाद साधण्याकडे महिला लक्ष देतात. एखाद्या ट्रोल करण्यातही त्या आघाडीवर असतात. घरगुती व्यवसाय, त्याचं मार्केटिंग, घर आवरणं, कमी वेळातील पौष्टिक जेवण आदी बघण्याकडेही महिलांचा कल असतो. वजन कमी करण्याचेही अनेक पर्याय त्या मोबाईलमध्ये शोधतात.सकारात्मक मार्गदर्शन, करिअर अन् स्टाईल!मोबाईल वापरामध्ये तरुणाई अग्रेसर आहे. फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप अन् इन्स्टाग्रामबरोबरच सकारात्मक मार्गदर्शन करणारे व्हिडीओ, करिअरविषयी विविध पर्याय, हॅपनिंग लाईफ स्टाईल हे पाहण्यात तरुणाई व्यस्त असते. तरुणांना बॉडी बिल्डर्स, नवनवीन गाड्या यांची क्रेझ असते तर तरुणी स्टाईल स्टेमेंट आणि क्रश कोर्सेसकडे अधिक लक्ष देतात. 

पुस्तक ऐकण्याबरोबरच आरोग्य विषयकही..!वयस्कांना मोबाईलवर सोशल मिडिया फारवेळ बघणं डोळ्याला त्रासदायक ठरते. मोबाईलवर अनेक प्रकारचे अ‍ॅप आहेत. वयस्कार म्हणूनच पुस्तक ऐकण्याचं अ‍ॅप डाऊनलोड करून त्याद्वारे पुस्तक ऐकण्याचा आनंद ते घेतात. याबरोबरच आरोग्याविषयी माहिती व वाढते वय आणि येणारे आजार याविषयी माहिती घेण्यात त्यांना अधिक रस असतो. घरगुती साहित्य व कशा प्रकारे करायचे यासाठीचे उपाय आणि प्रकृतीची काळजी घेण्याचे मार्गदर्शन त्यांना आकर्षित करते.सबकुछ मोबाईलच!मोबाईलच्या येण्यानं पुरुषांसाठी घरसुद्धा आॅफिस बनले आहे. कुठेही प्रवास करताना एका क्लिकवर सर्व कार्यालयीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे आॅफिसात गेल्यावर बघतो आणि सांगतो, असे म्हणण्याचे दिवस आता मागे गेले आहेत. कित्येकजण शेअर ट्रेडिंग करतात. त्यांना तर क्षणाक्षणाला शेअरच्या दरांचे चढउतार पाहायला मिळतात.कुटुंबाची ट्रिप फायनल करणं असो वा पेमेंट करणं असो एका क्लिकवर सगळं होत आहे. कापड, इमिटेशन ज्वेलरी, चप्पल आदी व्यावसायिक प्रत्यक्ष खरेदीसाठी न जाता फोटो पाहून आॅर्डर देतात. वेळ आणि पैसा यांची बचत होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMobileमोबाइल