शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक अकाऊंट हॅकर अंधारातच

By admin | Updated: October 16, 2014 22:51 IST

तपास सुरुच : मनसे जिल्हाध्यक्षांचा दाखविला होता ‘शिवसेना-राष्ट्रवादी’ला पाठिंबा

म्हसवड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष व माण विधानसभा मतदार संघातील उमेदवार धैर्यशील पाटील यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करून दि. १४ रोजीच्या रात्रीपासून बदनामीकारक छायाचित्रे व मजकूर अपलोड करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने कार्यकर्ते संतप्त झाल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष व माण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार धैर्यशील पाटील यांच्या नावाने फेसबुक अकाऊंट आहे. या अकाऊंटवर अज्ञाताने आक्षेपार्ह व बदनामीकारक छायाचित्र व मजकूर टाकला. या बाबतची माहिती मनसेचा कार्यकर्ता प्रशांत पाटील याने पाटील यांना फोनवरून दिली. त्यांनी हे फेसबुक अकाऊंट तपासून खात्री केली.त्यानंतर पाटील यांनी फेसबुक अकाऊंट बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अज्ञाताने या अकाऊंटचा पासवर्ड बदलला असल्याने ते शक्य झाले नाही. अखेर पाटील यांनी दहिवडी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवटे करत आहेत.या घटनेच्या मुळाशी जाणार असल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)विधानसभा निवडणुकीत मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार आहे. या परिस्थितीत माझे फेसबुक खात्याचा गैरवापर करून मतदारांत गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला गेला. मी शिवसेनेच्या व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याची खोटी माहिती यावर देण्यात आली. या प्रकणाच्या तळात जाणार आहे. दोषी व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे.- धैर्यशील पाटील,जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना-दहिवडी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आयटी अ‍ॅक्ट ६६ (अ) ४९९ (मदंवि अ) अशी कलमे लावण्यात आली आहेत. बदनामी करणाऱ्या कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.संशयित अद्यापही पडद्याआडमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या फेसबुकचा वापर करुन त्यांची बदनामी करणारा संशयित अद्यापही पडद्याआडच आहे. पाटील यांनी बुधवारी तक्रार दाखल केली होती. तक्रार देऊन ४८ तास उलटले असले तरी या संशयिताचा थांगपत्ता पोलिसांना लागलेला नाही. आपली बदनामी करण्यासाठी हितशत्रू वेगवेगळे फंडे राबवित आहेत. मात्र, बदनामी करणारे आता अत्यंत खालच्या थराला गेले असल्याचे पाटील यांनी सांगितले.