शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

सातारा जिल्ह्यात पाऊस ओसरला.. पूर कायम; पंचनामे सुरू!, कोयना धरणात किती पाणीसाठा.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:34 IST

माणमधील पूल पाण्याखाली; अनेक गावे संपर्काबाहेर

सातारा : पावसामुळे माण तालुक्यातील मार्डी-दहिवडी रस्ता रविवारपासून वाहतुकीस बंद असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. आठवडाभरातील पावसाने दुष्काळी माण व खटाव तालुक्यातील ओढे, नाले तलाव भरून वाहू लागले आहेत. राणंद तलावातील सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने येथील पूल पाण्याखाली गेला आहे. रविवारपासून वाहतूक बंद असल्याने दहिवडीला जाण्याचा मार्ग बंद झाला असून, पाणी कधी ओसरणार याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.वळई-विरळी, जांभुळणी, पानवण, गंगोतीसह वरकुटे-मलवडी परिसरात चार ते पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने माण तालुक्यात दाणादाण उडाली आहे. पुळकोटी गावच्या पुलावरून साधारणत: अडीच-तीन फूट पाणी वाहत असल्याने नागरिकांचा म्हसवड शहराशी संपर्क तुटला आहे. तर, काही ठिकाणी संततधार पावसाने घरांची पडझड झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

कोयना धरणात १९ टीएमसी पाणीसाठा..गेल्या आठ-दहा दिवसांपासून धुवाधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारी थोडा कमी झाला. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात १६.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मे महिन्यातील सलग आठ दिवसांच्या पावसामुळे धरणातही पाण्याची आवक झाली आहे. कोयना धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा १९.१९ टीएमसी आहे, तर गतवर्षीच्या २७ मे रोजी १६.३४ इतका साठा होता. गतवर्षी आटलेले आंधळी धरण मे महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले आहे.

बोरणे घाटात दरड कोसळली; वाहतूक पूर्ववत..सातारा-ठोसेघर मार्गावर असलेल्या बोरणे घाटात अतिवृष्टीमुळे सोमवारी रात्री दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने मंगळवारी सकाळी तातडीने दरड हटविण्याचे काम हाती घेतले. दुपारी हे काम पूर्णत्वास आल्यानंतर ठोसेघरकडे जाणारी वाहतूक पूर्ववत झाली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणWaterपाणी