कर्मचाऱ्याला मारहाण करून रोकड लुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:14 IST2020-02-04T12:13:38+5:302020-02-04T12:14:55+5:30

सातारा येथील गोडोली परिसरातील हॉटेल मराठा पॅलेसच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून ८० हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी महेश अंकुश भोरे (रा.भुडकेवाडी, ता. पाटण) यांनी अनोळखी चारजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

The employee was beaten and robbed of cash | कर्मचाऱ्याला मारहाण करून रोकड लुटली

कर्मचाऱ्याला मारहाण करून रोकड लुटली

ठळक मुद्देकर्मचाऱ्याला मारहाण करून रोकड लुटली चार संशयितांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार

सातारा : येथील गोडोली परिसरातील हॉटेल मराठा पॅलेसच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून ८० हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी महेश अंकुश भोरे (रा.भुडकेवाडी, ता. पाटण) यांनी अनोळखी चारजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. २ रोजी भोरे हे सायंकाळच्या सुमारास हॉटेलमध्ये बसले होते. त्यावेळी चार युवक हॉटेलमध्ये आले. त्यांनी भुरके यांना एका खोलीजवळ बोलवून घेतले. त्यानंतर त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.

संशयितांनी भोरे यांना डांबून ठेवत हॉटेलच्या स्वागत कक्षात असलेल्या टेबलच्या ड्रॉवरमधून व अकाऊं विभागातील कपाटात ठेवलेली ८० हजार रुपयांची रोकड जबरस्तीने चोरून नेली. या प्रकाराची माहिती भोरे यांनी हॉटेल व्यवस्थापनाला दिल्यानंतर अज्ञात चार संशयितांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक संदीप मोरे हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: The employee was beaten and robbed of cash