शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

वीजनिर्मिती अन् सिंचनाच्या कात्रीत कोयनेचं पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:10 PM

पाटण : कोयनेतील पाण्यासाठी सतत मागणी होत असून, मे महिन्याचे तब्बल ३१ दिवस हे धरणातील ४२.११ टीएमसी पाणीसाठ्याची खरी ...

पाटण : कोयनेतील पाण्यासाठी सतत मागणी होत असून, मे महिन्याचे तब्बल ३१ दिवस हे धरणातील ४२.११ टीएमसी पाणीसाठ्याची खरी अग्निपरीक्षा घेणारे ठरणार आहेत. कारण, कडक ऊन आणि विजेची वाढती मागणी तर दुसरीकडे सांगलीकडील पिण्याचे पाणी, सिंचनासाठी सतत धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. अशा दुहेरी मागणीमुळे पाणीसाठा मे अखेरपर्यंत पुरणार का? असा प्रश्न आहे.पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. १०५.२५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारा कोयना धरणाचा शिवसागर जलाशय हा तुडुंब भरलेला असतो; पण वर्षाच्या अखेरीस म्हणजेच मे महिन्यात कोयना धरणातील पाणीसाठा पुरेल की नाही याची चिंता लागलेली असते. कारण, कोयना धरणाचे पाणीसाठा वापराचे तांत्रिक वर्षे १ जून ते ३१ मे असे मोजले जाते. वर्षभरात कोयना धरणाच्या पाण्यावर वीजनिर्मिती होते. त्यासाठी ६७.०५ टीएमसी इतका पाणीसाठा राखीव ठेवला जातो. यावर्षी आतापर्यंत ४४.२६ टीएमसी पाणी वापर हा वीजनिर्मितीसाठी झाला तर पूर्वेकडील सिंचनासाठी २८.९६ टीएमसी पाणी पायथा वीजग्रह आणि नदी विमांचकमधून सोडण्यात आले. अजूनही पायथा वीजगृहातून २०० आणि नदी विमांचकमधून ९२४ क्युसेक पाणी दर दिवशी सोडण्यात येत आहे.सध्या धरणात ४२.११ टीएमसी पाणीसाठा आहे. तर गतवर्षी तो ४९.८९ टीएमसी इतका होता. यावर्षी प्रथमच कोयना धरणाच्या भिंतीला असणाऱ्या सहा वक्र दरवाजांच्या तळाच्या नदी विमांचकामधून सांगलीकडे पाणी सोडण्यात येत आहे. तीव्र उन्हाळा आणि सांगली पाटबंधारे विभागाची सततची वाढती पाणी मागणी, हे यामागील कारण आहे.पावसावर गणितकोयना धरणाचे नवीन तांत्रिक वर्ष १ जून रोजी सुरू होत आहे. मात्र, जूनमध्ये वेळेवर पाऊस सुरू झाला नाही तर मात्र सर्व नियोजन कोलमडून धरणातील पाणीसाठा पुरेल की नाही, याची चिंता लागते. आता जून महिन्यात किती पाणीसाठा राहतोय? यावर पाण्याचे गणित अवलंबून राहणार आहे.