शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांचे राजकारण!

By admin | Updated: December 1, 2015 00:11 IST

विरोधी नगरसेवक आक्रमक : सर्व विषय एकमताने मंजूर; सत्ताधाऱ्यांच्या विविध विषयांवर अधिकारी धारेवर--कऱ्हाड पालिका विशेष सभा

कऱ्हाड : कऱ्हाड शहरातील रस्त्यांच्या पॅचिंगचे काम करण्याचा विषय सत्ताधाऱ्यांना आताच कसा काय सुचला, आम्ही गेल्या चार वर्षांपासून सभागृहात विषय मांडूनही तो मंजुरीसाठी का केला गेला नाही, नगरपालिका निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी पक्षाकडून आता राजकारण केले जात आहे, अशी टीका विरोधी आघाडीतील नगरसेवकांनी केली. तर शहरातील प्रलंबित कामांवरून दोन्ही आघाड्यांतील नगरसेवकांनी प्रशानास धारेवर धरले. शहरातील रस्त्यांचे पॅचिंग, २०१६-१७ मधील हाती घ्यावयाची कामे, अग्निशमन विभागासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या साहित्यांबाबत मंजुरी तसेच शहरातील रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्यात येणाऱ्या कामांच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी आदी विषयांबाबत कऱ्हाड पालिकेची विशेष सभा आयोजित करण्यात आली.सोमवारी कऱ्हाड पालिकेची विशेष सभा पालिका सभागृहात पार पडली. नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे अध्यक्षस्थानी होत्या. मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांची उपस्थिती होती. शहरातील रस्त्याचे पॅचिंग करण्यास प्रशासनाकडून दिरंगाई उपस्थित केली जात आहे. पालिकेकडे आता रस्ते दुरुस्तीसाठी डांबर आहे. मात्र, काम करण्यासाठी यंत्रणा नाही. त्यामुळे आज रस्त्यांच्या पॅचिंगचे काम थांबले आहे. आता तर पालिकेने रस्ते पॅचिंगच्या कामाबाबत ३५ लाखांची निविदा काढली आहे. कामांची रक्कम जास्त असल्याने या कामाबाबत प्रस्ताव येणे अशक्य आहे. त्यामुळे प्रशासनाने निविदावरील कामांची किंमत कमी करणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तत्काळ लक्ष द्यावे, अशी लोकशाही आघाडीच्या अध्यक्षांनी नगराध्यक्षांकडे मागणी केली.जेव्हा विरोधकांकडून सभेदरम्यान ऐनवेळचा विषय मांडला गेला की, लगेच याबाबत सत्ताधारी आघाडातील नगरसेवकांकडून आक्षेप घेतला जात असे. त्यावेळी कडक नियम लावले जात असे. मात्र, आता हे नियम गेले कुठे ? असा सवाल विरोधी पक्षातील नगरसेवक विनायक पावसकर यांनी केला. शहरातील मागील वर्षातील विकासकामे प्रलंबित असून, ती लवकर होणे अपेक्षित आहे. प्रलंबित विकासकामांबरोबर शहरातील वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे. गुरुवार व रविवारी शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तत्काळ वाहनांच्या पार्किंगबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी सभेदरम्यान नगरसेवक विनायक पावसकर यांनी केली.यावेळी पालिकेकडून घेण्यात आलेल्या विशेष सभेवेळच्या सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)वीस मिनिटांची विशेष सभासोमवारी पालिकेच्या सभागृहात पाच विषयांबाबत निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यासभेदरम्यान सत्ताधारी व विरोधकांमधील वादावादी तसेच पाच विषयांना मंजुरी हा प्रकार वीस मिनिटांतच घडला. वीस मिनिटांत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. तर प्रशासनावरही ताशेरे ओढले गेले.