शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

महायुती की आघाडी.. सातारा जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा फडकणार?, उद्या होणार अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 19:26 IST

काँग्रेसच्या सदस्याची राष्ट्रवादीला साथ : स्वाभिमानीच्या सदस्याकडून स्वतंत्र गटाची नोंदणी

प्रमोद सुकरेकराड : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड शुक्रवारी (दि. २०) होणार आहे. स्पष्ट बहुमत कोणत्याही पक्षाला नसतानाही भाजप नेत्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. तसेच मित्रपक्षातील राष्ट्रवादी-शिंदेसेनेने भाजपला बाजूला ठेवत सत्ता स्थापनेसाठी रणनीती आखली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर नेमकी सत्तेची गुढी कोण उभारणार? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.खरंतर सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्तेतील मित्रपक्षांतच दोस्तीत कुस्ती पाहायला मिळाली. प्रचारादरम्यान झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये मिठाचा खडा पडला. त्यामुळे राज्यात सत्तेत एकत्रित असलेल्या महायुतीतील जिल्ह्यातील नेत्यांचा मेळ बसताना दिसत नाही. भाजपचे नेते मंत्री जयकुमार गोरे यांनी निकालानंतर लगेचच जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचा होईल, असा दावा केला. त्यामुळे मित्रपक्षांनी ‘ऑपरेशन लोटस’ची धास्ती घेतली. त्याचाच भाग म्हणून जवळजवळ महिनाभरापासून राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे सदस्य सहलीवर आहेत. आता शुक्रवारी हे सगळे साताऱ्यात येतील, पण त्यावेळी नेमकं काय होणार? सत्तेची गुढी कोण उभारणार? हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

आघाडीचीही त्यांना साथ...सहलीवर असलेल्या राष्ट्रवादी व शिंदेसेनेच्या सदस्यांसोबत आता कराडच्या काँग्रेसच्या एकमेव जिल्हा परिषद सदस्यही सहभागी झाल्या आहेत. सुरुवातीपासूनच सोबत असलेल्या स्वाभिमानीच्या एकमेव सदस्यानेही स्वतंत्र गटाची नोंद मध्यंतरी एकदा सातारला येऊन केली. त्यामुळे या निवडीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

सदस्य थंड हवेच्या ठिकाणी...गेला महिनाभर कर्नाटक-गोवा राज्यांत फिरत असलेले राष्ट्रवादी व शिंदेसेनेचे सदस्य सोमवारी महाराष्ट्र राज्यात परतले आहेत. सध्या ते एका थंड हवेच्या ठिकाणी असल्याचे सांगितले जात आहे. आता गुढीपाडव्याच्या पोळ्यांवर ते याच ठिकाणी ताव मारतील, अशी परिस्थिती आहे.

रात्र वैऱ्याची आहे...शुक्रवारी (दि. २०) सकाळी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणार आहे. या निवडीमध्ये आता एक रात्र आहे. हीच रात्र सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वच नेत्यांना वैऱ्याची वाटू लागली आहे. आपले सदस्य कोणत्याही परिस्थितीत प्रलोभनांना बळी पडू नयेत, याची काळजी ते घेत आहेत. शिवाय त्यांच्याशी कोणाचाही संपर्क होऊ नये, यासाठी त्यांचे भ्रमणध्वनी काढून घेण्यात आल्याचे खात्रीशीर समजते.

दोन उपाध्यक्ष? आश्चर्य नको...सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती निवडताना पक्षीय समतोल तर नेते सांभाळतीलच. पण त्याचबरोबर भौगोलिक समतोल सांभाळताना जिल्हा परिषदेत दोन उपाध्यक्ष झाले, तर आश्चर्य वाटायला नको, अशीही चर्चा महायुतीतील मित्रपक्षांच्या गोटात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Zilla Parishad: MahaYuti or Aghadi? Who will win?

Web Summary : Satara Zilla Parishad elections see a tussle between MahaYuti and Aghadi. Despite BJP's claim, other parties strategize. Members are at undisclosed location. Suspense looms!