साताऱ्यात फुटक्या तलावात वृद्धेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 17:04 IST2020-12-14T16:59:29+5:302020-12-14T17:04:08+5:30

suicide, Crimenews, police, Sataranews सातारा येथील फुटक्या तलावामध्ये सोमवारी पहाटे एका वृद्धेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.

Elderly man commits suicide in a small lake in Satara | साताऱ्यात फुटक्या तलावात वृद्धेची आत्महत्या

साताऱ्यात फुटक्या तलावात वृद्धेची आत्महत्या

ठळक मुद्देसाताऱ्यात फुटक्या तलावात वृद्धेची आत्महत्याआत्महत्या आजारपणाला कंटाळून केल्याची शक्यता

सातारा: येथील फुटक्या तलावामध्ये सोमवारी पहाटे एका वृद्धेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.

शारदा गणपतराव कामत (वय ७६,रा. शनिवार पेठ सातारा) असे आत्महत्या केलेल्या वृद्धेचे नाव आहे. याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शारदा कामत या सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या. त्या थेट फुटक्या तलावाजवळ आल्या. त्यानंतर त्यांनी तलावात उडी मारून आत्महत्या केली.

सकाळी सातच्या सुमारास तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना एक महिला तलावामध्ये तरंगत असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी नगरसेवक धनंजय जांभळे यांना माहिती दिली. जांभळे यांनी पेठेतील युवकांना बोलावून घेऊन कामत यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. शाहूपुरी पोलिसांना ही माहिती देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. शारदा कामत यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Web Title: Elderly man commits suicide in a small lake in Satara