शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळाप्रकरणी आठ संचालकांना अटक

By admin | Updated: November 27, 2015 00:41 IST

आण्णासाहेब पाटील पतसंस्था : गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

सांगली : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या आण्णासाहेब पाटील सहकारी पतसंस्थेतील १२ कोटी २६ लाख ७३ हजार २९६ रुपयांच्या अपहारप्रकरणी पतसंस्थेच्या आठ संचालकांना गुरुवारी अटक करण्यात आली.आठही संचालकांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास आल्यानंतर या विभागाच्यावतीने तातडीने आणि जलदगतीने तपास करत याप्रकरणी या आठ संचालकांना अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणातील संस्थापक-अध्यक्ष आण्णासाहेब पाटील याला अटक केली होती. याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सौ. मालती लक्ष्मण कोळी (वय ४८, रा. सैनिक वसाहत मागे, मिरज), रावसाहेब जयकुमार कवठेकर (५२, रा. आनंदसागर कॉलनी, मिरज), बाबासाहेब मारुती यादव (५८, रा. नवीन बायपास पूल, सांगलीवाडी), शंकर सितारा कोळी, (रा. सांगलीवाडी), सौ. कल्पना सुदाम रेंगडे (४८, रा. गणेशनगर, सांगली), जयंत नामदेव माने (५०, रा. कर्नाळ, सांगली), विशाल विलास पाटील (३५, रा. गोटखिंडी, ता. वाळवा), दयानंद विठ्ठल लोंढे (६०, रा. माजी सैनिक सोसायटी, मिरज) अशी अटक केलेल्या संचालकांची नावे आहेत. हे सर्व जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत.या पतसंस्थेतील गैरव्यवहाराबाबत तत्कालीन विशेष लेखापरीक्षक वर्ग दोनचे अधिकारी दिलीप जयवंत जाधव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी याचा तपास केला होता. पण त्यानंतर हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर पुन्हा या तपासाला गती देण्यात आली आणि त्यामध्ये अटक असलेल्या संस्थापक-अध्यक्ष आण्णासाहेब पाटील याची चौकशी करण्यात आली. याशिवाय या पतसंस्थेचे पुन्हा एकदा लेखापरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये बोगस सह्या व धनादेशाद्वारे पैसे बुडीत असलेल्या बल्लाळेश्वर पतसंस्थेत ठेवण्यात आल्याचे दाखविले. आठ जणांवर अटकेची कारवाई झाली आहे. अजून उर्वरित संचालकांनाही लवकरच अटक करण्यात येईल. (प्रतिनिधी)तत्कालीन संचालक जबाबदारजिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ही पतसंस्था निर्माण करण्यात आली होती. पण या पतसंस्थेत संस्थापक-संचालक आण्णासाहेब मलगोंडा पाटील याने मोठा घोटाळा केला. या घोटाळ्याला तत्कालीन संचालक मंडळालाही जबाबदार धरण्यात आले होते.