शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कमी खर्चात खत निर्मितीसाठी पाऊल प्रयास ; सामाजिक संस्थेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:29 IST

वडूज : कचरा हा सार्वजनिक कुंडीत किंवा कचरागाडीत टाकून प्रश्न संपत नाहीत. त्याची विल्हेवाट सरकारने अथवा नगरपंचायतीने करावी, ही ...

ठळक मुद्देवडूजकरांना ओल्या कचऱ्याबाबत मोफत मार्गदर्शन

वडूज : कचरा हा सार्वजनिक कुंडीत किंवा कचरागाडीत टाकून प्रश्न संपत नाहीत. त्याची विल्हेवाट सरकारने अथवा नगरपंचायतीने करावी, ही अपेक्षा असते. तो कचरा आपण केलेला आहे, त्याची जबाबदारी आपलीसुद्धा आहे. हेच ओळखून कचरा व्यवस्थापनाच्या या सामाजिक जबाबदारीत प्रत्येकाला सहभागी होता यावे, यासाठी येथील प्रयास सामाजिक संस्थेकडून घरगुती ओल्या कचरा व्यवस्थापनासाठी कमी खर्चात खत निर्मितीसाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

कचरा हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. साधारण १.५ लाख टन कचरा भारतात रोज निर्माण होत आहे. एकट्या महाराष्ट्रात ९३ लाख टन कचरा वर्षाला तयार होतो. त्यातील ७५ लाख टन हा घरगुती स्वरुपाचा आहे. कचरा १०० टक्के वर्गी व विलगीकरण प्रक्रिया पुनर्वापरात आणणे गरजेचे आहे.

सध्या नगरपंचायतीच्या माध्यमातून वडूजमध्ये कचरा निर्मूलनासाठी खासगी कंपनीला ठेका दिला आहे. महिना पाच लाख दहा हजार रुपयांप्रमाणे ठेकेदाराला पैसे मोजावे लागत आहेत. हा खर्च आटोक्यात आणायचा असेल तर या संस्थेच्या धर्तीवरचे प्रयोग अंमलात आणणे गरज आहे. हा घरगुती प्रकल्प अर्धा ते एक किलो कचºयासाठी आहे. तसेच यापेक्षा जास्त प्रमाणात ज्या ठिकाणी तयार होणाºयांना कचरा व्यवस्थापन करण्यासाठी संस्थेकडून मार्गदर्शन मिळेल व जीवाणू कल्चर उपलब्ध करून देण्यात येईल, असे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.नागरिकांना आवाहन...जाळीच्या बास्केट किंवा ट्रेला हिरवे नेट आतल्या बाजूने शिवून घ्या. बास्केटच्या तळाला दाभणाने एक छिद्र पाडून घ्या.तळातल्या बाजूला सुरुवातीला थोड्या नारळाचे केसर किंवा झाडाची वाळलेली पाने अंथरूण घ्यावे.त्याच्यावर दररोज अर्धा किलो कचरा टाकून त्यावर एक चमचा जीवाणू कल्चर टाकावे. ही प्रक्रिया दररोज करावी.बास्केट हवेशीर जागी ठेवावी, साधारण ४० दिवसांनंतर खत वापरास येईल, बास्केटमधील वरचा थर बाजूला काढून तळातील बाजूचे खत काढून घ्यावे.जीवाणू कल्चर वापरल्यामुळे बास्केटमध्ये हिट तयार होऊन कचºयाचे डिहायड्रेशन होऊन कचरा आकुंचन पावतो. त्यामुळे एक बास्केट किमान ४ ते ५ महिने भरत नाही.तसेच जीवाणू कल्चर वापरामुळे या कचºयातून वास किंवा दुर्गंधी येत नाही.जीवाणू कल्चर खर्च ३० रुपये दरमहा म्हणजेच १ रुपया प्रति दिवस एवढाच आहे.साहित्य व खर्च१ जाळीची प्लास्टिक बास्केट किंवा क्रेट - २०० रुपये,१ मीटर नेट जाळीचे कापड - ३० रुपये,जीवाणू कल्चर - दरमहा ३० रुपये

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी