शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

बारा वर्षांच्या मुलाच्या खुनाला व्यसनाची किनार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST

सातारा : दगडाने ठेचून खून झालेल्या बारा वर्षांच्या मुलाच्या खुनाला व्यसनाची किनार असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे येत आहे. ज्या ...

सातारा : दगडाने ठेचून खून झालेल्या बारा वर्षांच्या मुलाच्या खुनाला व्यसनाची किनार असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे येत आहे. ज्या मुलाने खून केला, तो सोळा वर्षांचा मुलगा गांजा आणि सिगारेट ओढत होता. व्यसनाच्या अधीन झालेल्या त्या मुलाला नेहमी प्रचंड रागही अनावर होत होता. ‘सर्किट’ म्हणूनच वस्तीवरील लोक त्याच्याकडे पाहत होते. असे असतानाच त्याला बारा वर्षांच्या मुलाने ‘नेपाळी’ म्हणून चिडवलं अन् व्यसनाधीन झालेल्या त्या ‘सर्किट’ मुलाने त्याचा दगडाने ठेचून खून केला.

सातारा शहरापासून जेमतेम चार किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हसवे गावानजीक लमाण वस्ती आहे. या वस्तीवर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील अनेक कुटुंबे मोलमजुरीच्या निमित्ताने स्थायिक झाली. इथल्या वस्तीवरील मुलांचे आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण झाले. काहींनी अर्ध्यातूनच शिक्षण सोडले, तर काहीजण अद्यापही शिक्षण घेत आहेत. या वस्तीवर बरीच कुटुंबे शिकली सवरलेली पण आहेत. मात्र, आपले काम भले आणि आपण, असा त्यांचा रोजचा दिनक्रम असतो. अशा या लमाण वस्तीवर बारा वर्षांच्या गंगाराम राठोड या मुलाचा खून झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. केवळ शिवीगाळ केल्याचा बदला म्हणून इतक्या टोकाची भूमिका घेऊन गंगारामला त्या मुलाने का मारले असेल? असे अनेक प्रश्न पोलिसांसह सर्व सातारकरांनाही पडले. त्यामुळे ‘लोकमत’ टीम गुरुवारी दुपारी लमाण वस्तीवर पोहोचली. वस्तीवरील वयोवृद्ध आणि काही युवकांशी चर्चा केल्यानंतर गंगारामच्या खुनापाठीमागील एक-एक किस्सा उलगडू लागला. लोक सांगू लागले. तो मुलगा खरं तर या वस्तीवर ‘सर्किट’ म्हणूनच ओळखला जातोय. कुणी काही म्हटलं तर तो अंगावर चाल करून यायचा. सतत गांजा आणि सिगारेट ओढून नशेत तर्रर असायचा. वडापावच्या गाड्यावर काम करत असताना तेवढाच तो ठिकठाक असायचा. परंतु इतर वेळी म्हणे तो स्वत:च्या तंद्रीत असायचा. मुलांमध्येही तो फारसा रमायचा नाही. त्याचे नाक थोडं बसकं. त्यामुळे गंगाराम त्याला नेपाळी म्हणून चिडवत होता. अगोदरच व्यसनाधीन असलेल्या त्या मुलाला राग येण्यास अवकाश. तो जर व्यसन करत नसता तर यदाकदाचित गंगारामचा खूनही झाला नसता. सर्वसामान्य मुलांसारखी त्याची वर्तणूक राहिली असती, असं एका आजोबांनी हतबल होऊन सांगितलं.

चौकट : वस्तीवर गांजा येतोय कुठून

लमाण वस्तीवर गांजा येतोय कुठून, असं एका युवकाला विचारलं असता त्यांनी अहोे, आमचा तालुका कर्नाटकाशेजारीच आहे. तेथे गांजा रग्गड मिळतो. रोज कोणी ना कोणी तरी गावावरूनच इथं येते. त्यावेळी गांजा आणला जातो. मग तो अशाप्रकारे लहान मुलांपर्यंतही हातोहात पोहोचवला जातो. एका शिकल्या सवरलेल्या मुलाला ही वस्ती गांजामूक्त व्हावी, असं मनापासून वाटतंय. हा सारा प्रकार पोलिसांच्याही कानावर घातलाय. आता बघू पुढे काय होतंय, असं तो काळजीच्या सुरात बोलून गेला.