शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

अपक्षच खाणार भाव

By admin | Updated: July 27, 2015 00:21 IST

वाईत अटीतटीचा सामना : वालेघर, किरोडे, जोरे येथे प्रशासक येण्याची शक्यता

संजीव वरे- वाई -तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या व महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ४३ गावांतील ग्रामपंचायतींसाठी ४५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले असून, १३१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर तीन ग्रामपंचायतींसाठी एकही उमेदवाराने अर्ज भरला नाही. २५ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. भविष्यात गावोगावी दोन तर काही ठिकाणी तीन गटांत निवडणुका होणार आहेत. दोन काँग्रेस आमने-सामने असताना अपक्ष कुणाची मते खाणार याला भलतेच महत्त्व आले आहे.गावची ग्रामपंचायत म्हणजे गावच्या विकासाचा केंद्रबिंदू. गावची एकी असली की लोकसहभागातून गावची विकासकामे, मोठमोठे प्रकल्प, शासनाच्या विविध योजना चांगल्या प्रकारे राबवून गावचा सर्वांगीण विकास व गावची शांतता टिकण्यासाठी निवडणुका बिनविरोध करणारी गावे सुरुर, सटालेवाडी, आनंदपूर, व्याहळी (पुनर्वसन) वयगाव, दह्याट, बेलमाची, खानापूर, शेलारवाडी, वेरुळी, कळंबे, बोरगाव, मालतपूर, पांढरेचीवाडी, नागेवाडी, रेनावळे, जांभळी, उळुंब, खावली, कोंढवली, अनपटवाडी, दरेवाडी, नांदगणे, दसवडी, बोरीव ही आहेत. तर बावधन, बोपेगाव, पसरणी, चिखली आणि अभेपुरी या गावांत अटीतटीच्या व रंगतदार लढती होणार आहेत. अनवडी, आसरे, भोगाव, चांदक, देगाव, धोम, एकसर, कडेगाव, खोलवडी, मोहडेकरवाडी, मुंगसेवाडी, निकमवाडी, पांडेवाडी, राऊतवाडी, वेलंग, विरमाडे, वासोळे, मुगाव, आकोशी, आसले, गुळुंब, गुंडेवाडी, लोहारे, मांढरदेव, मेणवली, परखंदी, शेंदूरजणे, शिरगाव, उडतारे, वरखडवाडी, वहागाव, वाशिवली, व्याजवाडी, गाढवेवाडी, धावडी परतवडी या गावांतील उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तर वालेघर, किरोडे व जोर येथे प्रशासक येण्याची शक्यता आहे. अनेक ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून, यावेळी काँग्रेस व त्यांच्यातच खरी लढत आहे. शिवसेना काही गावांत आपले प्रतिनिधी निवडून आणण्यात जोर लावते का? हेही आगामी काळात दिसून येईल. काही गावांत काँगे्रस, राष्ट्रवादीबरोबर तिसऱ्या अपक्षांच्याही लढती होऊन याचा फटका कोणाला बसतो? हेही निकालानंतर स्पष्ट होईल. आपले वरिष्ठ नेते एकमेकांत वेळप्रसंगी सलगी करताना मात्र गावोगावी एकमेकांची जिरवा जिरवीत ग्रामपंचायतीच्या निवडणुका रंगतदार ठरणार, हे मात्र निश्चित.ग्रामपंचायत निवडणूक राजकारणाचे दुष्परिणामशेतातील कामे करण्यासाठी मशागती व वारंगुळे सोडून दिले जातात. त्यामुळे ज्यांच्याकडे बैल व अवजारे नसतात त्यांना खूप त्रास होतो.सत्ताधारी गटाच्या ग्रामसभांना विरोधी ग्रामस्थ न आल्याने निर्णय तडीस जात नाहीत.लोक सहभाग व लोक वर्गणी दोन गट झाल्याने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प योजना रखडतात.एकमेकांवर कुरघोडी, उणीधुणी काढण्याने गावची विकासकामे होत नाहीत.एक गाव एक गणपती, डॉल्बी बंद असे निर्णय व वेगवेगळ्या कमिट्या स्थापनेत अडसर येतो. पावसापेक्षा प्रचाराचा जोर वाढला तालुक्यात पावसाचा जोर कमी; पण प्रचाराचा जोर चांगलाच वाढला आहे. मधल्या काळात उघडीप दिल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. परंतु ऐनवेळी पुन्हा पावसाचे आगमन झाले आणि पिकांना जीवदान मिळाले. त्यामुळे पदयात्रा, बैठका, जेवणावळी, प्रचाराचा जोर मात्र वाटला आहे. अनेक गावांत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रमुख लढती आहेत. मात्र या पक्षातील बंडखोर व अपक्ष उमेदवार कोणाचे मतदान घेणार यावरही अनेक निकालांची गणिते फिरतील.