कोयना परिसरात भूकंपाचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:19 IST2019-04-29T23:19:17+5:302019-04-29T23:19:23+5:30
कोयनानगर : कोयना धरण परिसरात रविवारी मध्यरात्री १२ वाजून २९ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ...

कोयना परिसरात भूकंपाचा धक्का
कोयनानगर : कोयना धरण परिसरात रविवारी मध्यरात्री १२ वाजून २९ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ३.५ इतकी नोंदविण्यात आली आहे. या धक्क्याने पाटण, कोयना, पोफळी व चिपळूण येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भूकंपाचा केंद्र्रबिंदू कोयना धरणाच्या भिंतीपासून १६.८ किलोमीटर अंतरावर गोषटवाडी गावाच्या नैर्ऋत्य दिशेला नऊ किलोमीटर अंतरावर होता, तर भूकंंपाची खोली ११ किलोमीटर इतकी होती. भूकंपाच्या धक्क्याने घरातील भांडी वाजू लागल्याने अनेकजण घराबाहेर पडले. मध्यरात्रीच्या सुमारास हा धक्का बसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही हानी झाली नाही. तसेच कोयना धरणास कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा कोयना धरण व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे.