आधी महाबळेश्वर; नंतर धोम परिसर...निसर्गसौंदर्याची पर्यटकांना भूरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 11:29 IST2017-11-01T11:23:40+5:302017-11-01T11:29:01+5:30
वाई तालुक्यातील धोम आणि बलकवडी धरण परिसरातील निसर्गरम्य परिसर पर्यटकांना भूरळ घालत असून सध्या दिवाळीची सुट्टी असल्याने हजारो पर्यटक निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी येत आहेत. महाबळेश्वर पाहून झाल्यानंतर पर्यटकांची पावले वाईच्या महागणपतीसह धोम धरणाकडेही वळू लागली आहेत. असे असलेतरी येथे अनेक सोयीसुविधांची वानवा असून ती सोडविण्याचा प्रयत्न होण्याची गरज आहे.

महाबळेश्वरबरोबरच धोम धरणावर पर्यटकांची झुंबड उडाली आहे.
वाई : वाई तालुक्यातील धोम आणि बलकवडी धरण परिसरातील निसर्गरम्य परिसर पर्यटकांना भूरळ घालत असून सध्या दिवाळीची सुट्टी असल्याने हजारो पर्यटक निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी येत आहेत. महाबळेश्वर पाहून झाल्यानंतर पर्यटकांची पावले वाईच्या महागणपतीसह धोम धरणाकडेही वळू लागली आहेत. असे असलेतरी येथे अनेक सोयीसुविधांची वानवा असून ती सोडविण्याचा प्रयत्न होण्याची गरज आहे.
मिनी कोकण समजला जाणारा वाईचा पश्चिम भाग हा जैवविविधतेने नटलेला आहे. या भागात रायरेश्वर, कमळगड, केंजळगड, यांच्यासह सह्याद्रीच्या उतुंग पर्वत रांगा आहेत. येथीलच व पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेले धोम व बलकवडी धरण याच भागात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत.
सध्या दिवाळीची सुट्टी संपत आल्याने महाबळेश्वरला येणारे पर्यटक वाईच्या महागणपतीसह पश्चिम भागातील धोम धरणाला भेट दिल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे महाबळेश्वरबरोबरच धोम धरणावर पर्यटकांची झुंबड उडाली आहे.