उन्हाळा, हिवाळा, पावसाळा @ महाबळेश्वर

By admin | Published: May 29, 2017 11:12 PM2017-05-29T23:12:52+5:302017-05-29T23:12:52+5:30

उन्हाळा, हिवाळा, पावसाळा @ महाबळेश्वर

Summer, winter, rains @ Mahabaleshwar | उन्हाळा, हिवाळा, पावसाळा @ महाबळेश्वर

उन्हाळा, हिवाळा, पावसाळा @ महाबळेश्वर

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून जग प्रसिद्ध असणारे महाबळेश्वर तसेच महाराष्ट्राची चेरापूंजी व नंदनवन म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये सध्या तिन्ही ऋतूंचा म्हणजे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असा निसर्ग सध्या पर्यटकांना महाबळेश्वरमध्ये अनुभवयाला मिळत आहे. त्यामुळे महाबळेश्वर हे सध्या पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेले आहे
महाबळेश्वर हे पर्यटकांचे पर्यटन स्थळ हे आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. दरवर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात. सध्या महाबळेश्वरमध्ये बारमाही हंगाम भरत आहे आणि विकेंडला तर हाऊस फुल गर्दी होत आहे.
या हंगामात अनेकवेळा पर्यटकाना नो टॅक्सी व नो रूम याचा ही सामना करावा लागला. अनेक पर्यटकांनी वाई परिसरात मुक्काम ठोकला; परंतु पर्यटकांचा मुख्य हंगाम म्हणजे एप्रिल-मे आणि जून असून येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही दरवर्षी वाढतच चाललेली आहे.
कडक उन्हात पावसाचे वातावरण निर्माण होऊन पाऊस पडत आहे. तसेच या पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद पर्यटकांबरोबर स्थानिक नागरिकांनीही लुटला आहे. रात्रीच्या वेळी दाट धुके सगळीकडे पसरत आहे. त्यातच थंडगार वारेही वाहत असल्याने गारवा पडत आहे. पर्यटक दाट धुक्याचा व थंडीचा आंनदही घेत आहेत. चालू मे महिन्यात हे कितीतरी वेळा वातावरण पाहावयास मिळत आहे. अशा निसर्ग सौदर्याला वर्षाराणीने न्हाऊ घातल्याने वातावरणात चांगलाच बदल घडून आला आहे.
महाबळेश्वरची खासीयत व पर्यटकांना आकर्षित करणारी येथील स्ट्रॉबेरी, चन्ना, जाम, चिक्की, गर्मीचे कपडे, शोभेच्या वस्तू, अशा ऐकापेक्षा एक वस्तूंनी पर्यटक भारावून जातो व या वस्तूंची पर्यटकांमधून मोठी मागणी असल्याने बाजारपेठ या भरभरुन गेल्या आहेत. तसेच पर्यटकसुध्दा या वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत.
कौटुंबिक सहल तसेच मुंबई, पुणे, गुजरात या ठिकाणाहून पर्यटक ट्रॅव्हल एजंटकडून सोईस्कर पॅकेज काढून अनेक पर्यटक मंडळी मनमुराद आनंद लुटण्यासाठी आली आहेत. वनविभागाकडून ठराविक प्रेक्षणीय स्थळे, पॉर्इंटची डागडुजी केली गेली असल्यामुळे पर्यटकांना याचे खास आकर्षण झाले आहे तसेच सायंकाळच्या वेळेस वेण्णा लेक येथील बोटिंग व तेथील स्वादिष्ट गरमागरम मक्का कणीस, स्ट्रॉबेरी, क्रीम, ज्यूस तसेच मुख्य बाजारपेठेत खरेदी व फिरण्याचा मनसोक्त आनंद घेत पर्यटकांची येथे रात्री उशीरापर्यंत गर्दी होत आहे.

Web Title: Summer, winter, rains @ Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.