शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

दुमदुमली लोणंदनगरी

By admin | Updated: June 29, 2014 00:28 IST

टाळ-मृदंगाचा गजर : भजनात रमले वारकरी

लोणंद : टाळ- मृदंगाचा गजर, भजनात रमलेले वारकरी, अखंड हरिनामाचा जप करत लाखो वारकरी शनिवारी लोणंदनगरीत विसावले. विठू नामाच्या जयघोषाने अवघी लोणंदनगरी दुमदुमून गेली आहे. माउलींचा रथ पालखीतळावर विसावल्यानंतर सायंकाळी सांज आरती झाली. शनिवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील भाविकांनी माउलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यामुळे पालखीतळापासून दोन किलोमीटरपर्यंत पुरुष व महिलांच्या स्वतंत्र्यपणे रांगा लागल्या होत्या. प्रथेप्रमाणे सकाळी कीर्तन सोहळा पार पडला. तंबूशेजारी उभ्या असलेला माउलींचा रथ व अश्वाचेही दर्शन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. लोणंदनगरीत आलेल्या वारकऱ्यांना विविध सामाजिक संघटना, संस्था, गणेशोत्सव मंडळे व अनेक भक्तांनी वैयक्तिकरीत्याही जेवण, फराळ, फळांचे वाटप केले. माउलींसाठीमानाचा नैवेद्य घेऊन लोणंदमधील ग्रामस्थ जात होते. पालखी आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त केला होता. अपर पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली ५ उपअधीक्षक, १६ पोलीस निरीक्षक, ५१ सहायक पोलीस निरीक्षक, ४६५ पुरुष पोलीस, ५५ महिला पोलीस, शंभर वाहतूक पोलीस जवानांसह गृहरक्षक दलाचे ४०० जवान तैनात आहेत. यामुळे चौकाचौकात पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गर्दीत अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलिसांची करडी नजर असून बॉम्ब शोधक पथक, श्वानपथक पाचारण केले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही संख्या वाढविली आहे.लोणंद शहरात संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या २५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. (वार्ताहर)