शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Satara: मृत्यूनंतरही यातना; ओढ्यावर पूल नसल्याने मृतदेह ट्रॅक्टरमधून स्मशानभूमीत नेण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 17:17 IST

देश स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही ओढ्यावर पूल न बांधल्याने आदर्की खुर्द येथे मृत्यूनंतर यातना सहन कराव्या लागत आहेत.

सूर्यकांत निंबाळकरआदर्की : फलटण पश्चिम तालुक्यात सहा दिवस संततधार पावसामुळे सर्व तलाव, बंधारे, ओढे, नाले भरून वाहत असताना आदर्की खुर्द येथे वृद्ध महिलेचे निधन झाले; पण स्मशानभूमी ओढ्याच्या पलीकडे असल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह ट्रॉलीत ठेवून ओढ्याच्या पलीकडे नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले; पण देश स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही ओढ्यावर पूल न बांधल्याने आदर्की खुर्द येथे मृत्यूनंतर यातना सहन कराव्या लागत आहेत.आदर्की खुर्द हे तीन हजार लोकसंख्येचे गाव. या गावात १९९० दरम्यान मुख्य ओढ्याच्या पलीकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी शेड बांधले; पण दहा वर्षे या शेडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत नव्हते; पण अतिवृष्टीमुळे एका महिलेचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर पंधरा वर्षांनंतर मुख्य ओढ्यावर पूल बांधण्यात आला; पण दुसऱ्या लेंढवळीच्या ओढ्यावर पूल बांधला गेला नाही. या ओढ्यात पावसाळ्यात गाळ साठतो तर मोठा पाऊस झाला तर पूर येतो, त्यामुळे ग्रामस्थ, महिला, विद्यार्थ्यांना ये-जा करताना त्रास होतो तर गावातील कोणाचा पावसाळ्यात मृत्यू झाल्यास रस्ता व पूल नसल्याने सकाळी अंत्यसंस्कार करावे लागतात.

आदर्की परिसरात चार दिवस संततधार पावसामुळे ओढे नाले भरून वाहत आहेत. यातच एका महिलेचा वृद्धापकाळाने निधन झाले. सर्व पाहुणे, ग्रामस्थांच्या उपस्थित घरापासून मृतदेह खांद्यावर ओढ्यापर्यंत नेण्यात आला व ओढ्याला पाणी असल्याने तेथून मृतदेह टॅक्टर ट्रॉलीत खांदेकरी व तरुण बसून गेले; परत मृतदेह ट्रॉलीतून खांद्यावर घेऊन नवीन बांधलेल्या शेडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

ओढ्यावर पूल नसल्याने मृतदेह खांद्यावरून दोनदा खाली ठेवून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून पलीकडे न्यावा लागल्याने आदिवासी गावे विकसित झाली आहेत; पण आदर्की खुर्द गावाला स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल, रस्ता नाही हे दुर्दैव आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधींनी पाहणी करून यावर मार्ग काढावा. -सतीश निंबाळकर, माजी सरपंच, आदर्की खुर्द, ता. फलटण

टॅग्स :Satara areaसातारा परिसरphaltan-acफलटण