महाबळेश्वरमध्ये पावसाची संततधार, वेण्णालेक धरणाचा सांडवा ओसंडून वाहू लागला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 16:36 IST2023-07-08T16:34:52+5:302023-07-08T16:36:05+5:30
महाबळेश्वर व पाचगणी या दोन शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला

महाबळेश्वरमध्ये पावसाची संततधार, वेण्णालेक धरणाचा सांडवा ओसंडून वाहू लागला
अजित जाधव
महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरु असल्यामुळे २४ तासात 138 मि मी (5 इंच )पावसाची नोंद झाली. पावसाने 1301 मि मी (51 इंच) अर्ध शतकासोबत वेण्णालेक धरणाचा सांडवा काल, शुक्रवारी रात्री पासून ओसंडून वाहू लागल्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी या दोन शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला.
पाऊस अंगावर झेलण्यासाठी अन् धुक्याच्या दुलईचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी हौशी पर्यटकांची पावले या पर्यटन नगरीकडे वळू लागली आहेत. दोन दिवसाच्या मुसळधार पाऊसाने शनिवारी थोडा वेळ उघडीप घेतल्या मुळे शनिवार रविवार सुट्टी दिवशी मुबंई पुणे गुजरात पर्यटकाची मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मध्ये गर्दी दिसून येत होती. वेण्णालेक धरणाच्या साडव्या नजीक पर्यटक गरमा गरम मका कणीस, चहा भजीचा मनमुरादपणे आनंद लुटत होते. शनिवार रविवार असल्याने नेताजी सुभाष चौक बाळासाहेब ठाकरे चौक परिसरात पर्यटाकच्या वाहनाची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. पोलिस प्रशासन नसल्याने काही पर्यटकच वाहतुक कोंडी सुरळीत करत होते.
मेटगुताड ग्रामपंचायतीच्यावतीने नवीन पॅाईट लिंगमळा धरण केल्यामुळे महाबळेश्वरला निसर्गाचं वरदान लाभलं असून, येथील हिरवीगार वृक्षराजी, उंचच-उंच डोंगर रांगा, त्यातून फेसाळणारा जलप्रपात, पर्यटक या पर्यटनस्थळाला भेट देतात. पावसामुळे येथील निसर्ग हिरवाईने नटून गेला आहे. धो-धो बरसणाऱ्या जलधारा अन् चहूकडे पसरलेली धुक्याची दुलई स्वर्गीय अनुभव देत आहे.