पाच महामार्गांमुळे माण तालुक्यातील बाजारपेठांना येणार बहर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 16:13 IST2017-12-08T16:04:13+5:302017-12-08T16:13:05+5:30
पिढ्यान्पिढ्या दुष्काळी तालुका म्हणून परिचित असणारा व विकासापासून आजवर दुर्लक्षित असलेल्या माण तालुक्यातून पाच महामार्गांची कामे सुरू झाल्याने दळणवळणाची मोठी सोय होणार आहे. अनेक मोठी शहरे दुष्काळी भागाशी जोडली जाणार असल्याने पुढील काळात या भागाच्या विकासाचा हे रस्ते महामार्ग ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

पाच महामार्गांमुळे माण तालुक्यातील बाजारपेठांना येणार बहर!
म्हसवड : पिढ्यान्पिढ्या दुष्काळी तालुका म्हणून परिचित असणारा व विकासापासून आजवर दुर्लक्षित असलेल्या माण तालुक्यातून पाच महामार्गांची कामे सुरू झाल्याने दळणवळणाची मोठी सोय होणार आहे. अनेक मोठी शहरे दुष्काळी भागाशी जोडली जाणार असल्याने पुढील काळात या भागाच्या विकासाचा हे रस्ते महामार्ग ठरणार असल्याचे दिसून येत आहे. यामुळे या पाच महामार्गांमुळे माण तालुक्यातील बाजारपेठांना आता बहर येणार आहे.
भारतीय राजमार्ग प्राधिकरण मुख्य अभियंता व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारित माण तालुक्यातून जाणाऱ्या अनेक महामार्गांची सध्या कामे सुरू झाले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-सी सातारा-म्हसवड-लातूर-टेंभुर्णीमार्गे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-ई म्हसवड-पिलीव-पंढरपूर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ मनमाड-कोपरगाव व राज्य सेक्शन १ फलटण ते दहिवडी व सेक्शन २ दहिवडी-गोंदवले-मायणी-विटा या रस्त्यावरून हे महामार्ग जाणार आहे. या महामार्गांची कामे वेगाने सुरू झाली आहेत. त्यामुळे दळणवळणाची मोठी सोय व जलद प्रवास होणार आहे.
म्हसवड शहर ऐतिहासिक असून, येथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीचे हेमाडपंथी मंदिर असल्याने येथे वर्षभर भक्तांची वर्दळ असते तर आमावस्या, पोर्णिमेला व रविवारी विशेषत: श्रींच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत असतात. या महामार्गांमुळे भक्तांना श्रींचे दर्शनासाठी येण्या-जाण्यासाठी प्रशस्त रस्त्यावरून सुरक्षित व जलद प्रवास करता येणार आहे.