भरधाव कारचा टायर फुटल्याने दुभाजकाला धडक-दुचाकीची ट्रकला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 13:06 IST2019-04-05T13:06:07+5:302019-04-05T13:06:39+5:30

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सुरूर हद्दीत शुक्रवारी सकाळी भरधाव कारचा टायर फुटल्याने ती दुभाजकाला धडकली.  या परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात

Due to the firing, the truck hit the truck and hit the truck | भरधाव कारचा टायर फुटल्याने दुभाजकाला धडक-दुचाकीची ट्रकला धडक

भरधाव कारचा टायर फुटल्याने दुभाजकाला धडक-दुचाकीची ट्रकला धडक

ठळक मुद्देदोन दुर्घटनेत तिघेजण जखमी : सुरूर हद्दीत दुसºया अपघातात

वेळे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सुरूर हद्दीत शुक्रवारी सकाळी भरधाव कारचा टायर फुटल्याने ती दुभाजकाला धडकली.  या परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तिघेजण जखमी झाले. त्यांना तातडीने सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. 

याबाबत माहिती अशी की, पुण्याहून सातारा बाजूला जाणारी भरधाव कार (एमएच १२ पीझेड ५१९७) वाई तालुक्यातील सुरुर हद्दीत आली असता त्याचा पुढील टायर फुटला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रस्ता दुभाजकाला जोरात धडकली. या अपघातात गाडीतील शरदचंद्र देसाई व स्वाती भंडारी (दोघे रा. पुणे) हे जखमी झाले. 

तसेच अन्य एका अपघातात दुचाकीस्वार प्रवीण टेम्बे (रा. सहकारनगर, पुणे) हे दुचाकी (एमएच १४ बीएच ३७९८) वरुन निघाले होते. ते ट्रक (एमएच ०५ एएच २३९५)ला ओव्हरटेक करत असताना ट्रकला धडकला. यात प्रवीण टेम्बे हे गंभीर जखमी झाले. हे दोन्ही अपघात शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास झाले. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे. 

गाडीचे नुकसान
भरधाव कारचा टायर फुटल्याने रस्त्या दुभाजकाला धडली. यामध्ये गाडीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर मोठा आवाज झाला. तेथून निघालेल्या इतर वाहनचालकांना अपघात पाहिल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना दिली. 

Web Title: Due to the firing, the truck hit the truck and hit the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.