शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

स्ट्रॉबेरीसह पालेभाज्यांवर रोगांचा प्रादुर्भाव, उत्पन्नावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 1:24 PM

पसरणी : वाई तालुक्यातील बदलत्या हवामानामुळे स्ट्रॉबेरीसह भाजीपाला यावर पडणाऱ्या करपा, तांबेरा, पांढरी भुरीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. स्ट्रॉबेरीसह ...

ठळक मुद्देस्ट्रॉबेरीसह पालेभाज्यांवर रोगांचा प्रादुर्भाव, उत्पन्नावर परिणामवाई तालुक्यात करपा, तांबेरा, पांढरी भुरीमुळे शेतकरी हैराण

पसरणी : वाई तालुक्यातील बदलत्या हवामानामुळे स्ट्रॉबेरीसह भाजीपाला यावर पडणाऱ्या करपा, तांबेरा, पांढरी भुरीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. स्ट्रॉबेरीसह भाजीपाला वाचविण्याचे आव्हानच रोगांनी दिल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.वाईच्या पश्चिम भागात गोळेवाडी, गोळेगावसह कोंडवली या गावांमधून स्ट्रॉबेरीसह भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतला जातो. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी झाल्याने रोगराईचा बिमोड हवा तसा झालेला नाही, त्यातच वारंवार बदल होत असल्याने हवामानामुळे सध्या या भागातील स्ट्रॉबेरीसह कारले, तोडका, कोबी, वांगी, फ्लॉवर, टोमॅटो या पिकांवर तांबेरा, पांढरी भुरी, करपा, दावण्या, स्पॉट या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झालेला आहे.

रोगांचा प्रादुर्भाव शासनाकडून जास्तीत-जास्त मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावा व तसा कृषी विभागाने पाठपुरावा करून शासन दरबारी सादर करावा, अशीही मागणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी विकास सेवा सोसायटी, बँकांकडून कर्ज घेऊन शेतांची डागडुजी करावी लागते. यावर्षी स्ट्रॉबेरीसह सर्वच भाज्यांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने भाजीपाला करण्यासाठी झालेला खर्च जरी निघाला तरी समाधान मानावे लागणार आहे.कृषी विभागाने मार्गदर्शन करावे...कृषी विभागाने या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना पीक संरक्षणाविषयी व रोगांच्या बिमोडासाठी औषधांची फवारणी कशी करावी, यासाठी मार्गदर्शन करून व होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानfruitsफळेSatara areaसातारा परिसरPanchgani Hill Stationपाचगणी गिरीस्थान