शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात धरणे गाठतायत तळ, उन्हाची झळ...

By admin | Updated: March 23, 2017 12:53 IST

नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागले : पूर्व भागाला टंचाईच्या झळा; पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज

आॅनलाईन लोकमतसातारा : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्याने नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागले आहेत. परिणामी जिल्ह्याच्या पूर्व भागाला टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. जिल्ह्यातील बहुतांश धरणे निम्म्यावर आली असून, काही धरणांमधून शेतीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. सद्य:स्थिती पाहता पुढील दोन महिन्यांत धरणे तळ गाठणार असून, संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्ह्यात लहान-मोठी जवळपास १५ धरणे आहेत. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने कोयना, कण्हेर, उरमोडी, धोम, नीरा-देवघर, भाटघर, तारळी आदी धरणे पूर्ण क्षमतेने भरली. तसेच कूपनलिका, विहिरी, ओढे व तलावांमध्येही मुबलक पाणीसाठी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने जिल्ह्याच्या पूर्व भागात असलेल्या माण, खटाव, कोरेगाव, फलटण या तालुक्यांमधील नैसर्गिक जलस्त्रोत हळूहळू आटू लागले आहेत. परिणामी ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या वतीने माण, फलटण तालुक्यांत पाणी टॅँकर सुरू करून ग्रामस्थांना दिलासा दिला असला तरी पुढील दोन महिन्यांत पूर्व भागातील पाणीटंचाईचे चित्र अधिक भीषण होणार आहे.एकीकडे जलस्त्रोत आटत चालले असताना दुसरीकडे धरणांंमधील पाणीसाठाही खालावत चालला आहे. कोयना व उरमोडी धरण वगळता बहुतांश धरणे जवळपास निम्म्यावर आली आहेत. कोयना धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा काही प्रमाणात पाणीसाठा जास्त असला तरी वीजनिर्मिती व शेतीसाठी पाण्याचा वापर पाहता पावसाळा सुरू होईपर्यंत दोन्ही बाबींसाठी पाण्याचा मेळ घालणे कोयना व्यवस्थापनापुढे आव्हान असणार आहे. (प्रतिनिधी)कोयनेत ६.९५ टीएमसी पाणीसाठा अधिक१०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले कोयना धरण गेल्या वर्षी जवळपास शंभर टक्के भरले. त्यामुळे वीजनिर्मितीसह, सिंचन व शेतीपाण्याचा प्रश्न यंदा काही प्रमाणात मिटला. कोयना धरणात आजमितीस ४८.१४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, गेल्या वर्षी याच दिवशी ४१.१९ टीएमसी पाणी शिल्लक होते. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात ६.९५ टीएमसी पाणी अधिक आहे. धरणातील १३ टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जाणार आहे. तर ६ टीएमसी पाणी सांगली लघू पाटबंधारे विभागाला वीज व शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. २३ टीएमसी पाण्याचा उपयोग सातारा जिल्ह्यातील शेतीसाठी होणार आहे.