शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, आदिवासींसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या डॉ. राम गोडबोले यांना पद्मश्री पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 12:05 IST

लग्नानंतर फक्त दोन आठवड्यांनी, ते बस्तरच्या दुर्गम भागात आले आणि आदिवासी समुदायाशी एकरूप झाले

सातारा : छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशात आदिवासी समुदायाची सेवा करण्यासाठी आयुष्य समर्पित करणारे साताऱ्यातील डाॅ. राम गोडबोले व त्यांच्या पत्नी सुनीता यांना शासनाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री जाहीर केला. यामुळे साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.साताऱ्यात जन्मलेल्या डॉ. राम गोडबोले यांनी ३० वर्षांपूर्वी आर्यांग्ल हाॅस्पिटलमध्ये आयुर्वेदिक औषध आणि शस्त्रक्रियेचे शिक्षण घेतले. त्यांच्या मनात समाजसेवेचे बीज तरुण वयातच अंकुरले. सुमारे १८-१९ वर्षांच्या वयात त्यांनी अल्बर्ट श्वेत्झर यांच्या जीवनावरील एक पुस्तक वाचले, ज्याने त्यांच्या विचारसरणीत बदल घडवून आणला. श्वेत्झर - एक महान समाजसेवक आणि डॉक्टर होते. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य आफ्रिकेतील वंचित समुदायांना समर्पित केले आणि १९५२ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. त्याचक्षणी डॉ. गोडबोले यांनी ठरवले की औषध हे त्यांचे उपजीविका नसून त्यांची आध्यात्मिक साधना असेल.शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते वनवासी कल्याण आश्रम या अखिल भारतीय संघटनेत सामील झाले आणि महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील कनाशी येथे राहणाऱ्या भिल्ल आदिवासी समुदायाला आरोग्यसेवा पुरविण्यास त्यांनी सुरुवात केली. काही वर्षांनंतर वयाच्या २८ व्या वर्षी त्यांना छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील बारसूर गावात पाठवण्यात आले, जिथे एक आरोग्य केंद्र बराच काळ बंद होते. हे ठिकाण त्यांचे कायमचे कामाचे ठिकाण बनले.आश्रमाने त्यांना एकटे न जाण्याचा आणि प्रथम लग्न करण्याचा सल्ला दिला. या काळात, त्यांची भेट पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या सुनीता पुराणिक यांच्याशी झाली. ज्या महिला सक्षमीकरण आणि साक्षरता अभियानात सक्रिय होत्या. सुनीताताई रायगड जिल्ह्यातील वनवासी कल्याण आश्रमाच्या जांभिवली केंद्रात सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही काम करत होत्या. दोघांचीही विचारसरणी आणि सेवेची भावना समान होती.लग्नानंतर फक्त दोन आठवड्यांनी, ते बस्तरच्या दुर्गम भागात आले आणि आदिवासी समुदायाशी एकरूप झाले. सध्या डॉ. गोडबोले आणि त्यांच्या पत्नी बारसूर गावात एका साध्या दोन खोल्यांच्या घरात राहतात. विटांच्या भिंती, पत्र्याचे छप्पर आणि त्याभोवती घनदाट जंगल आहे. येथे लोकांकडे औषधांसाठी पैसेच नाहीत आणि वाहतूक जवळजवळ अस्तित्वात नाही.समाजमाध्यमावर कौतुकडॉ. राम गोडबोेले हे साताऱ्यातील आर्यांग्लचे माजी विद्यार्थी असल्याने पद्मश्री जाहीर झाल्याचे कळताच असंख्य माजी विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांवर कौतुकाचे संदेश पोस्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara's Dr. Ram Godbole Awarded Padma Shri for Tribal Service

Web Summary : Satara's Dr. Ram Godbole, dedicated to serving Chhattisgarh's tribal communities, and his wife Sunita, were awarded the Padma Shri. Inspired by Albert Schweitzer, he provides healthcare in remote areas after working with Vanvasi Kalyan Ashram. The couple lives simply, devoted to their mission.