घरगुती वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत, युवकाचा खून; सातारा जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 12:30 IST2022-04-28T12:29:47+5:302022-04-28T12:30:21+5:30
औंध : घरगुती वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत होवून एका युवकाचा खून झाला. विशाल आप्पासो येवले (वय-२४) असे मृत युवकाचे ...

घरगुती वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत, युवकाचा खून; सातारा जिल्ह्यातील घटना
औंध : घरगुती वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत होवून एका युवकाचा खून झाला. विशाल आप्पासो येवले (वय-२४) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे खटाव तालुक्यात एकच खळबळ उडाली. वडी येथे काल, बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
वडी येथीलच नात्याने मामा सासरे असणारे पोपट मोहन येवले (वय-४५), मनोज मोहन येवले (३६) आणि वैशाली मनोज येवले (३०), पोपट मोहन येवले (४५), वंदना पोपट येवले (४१) व मुलगा करण पोपट येवले (१९) यांच्यामध्ये झालेल्या भांडणात विशाल याच्या वर्मी वार झाला. त्याला उशीरा कराड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित चौघांना औंध पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर करण पोपट येवले हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अधिकारी डॉ. निलेश देशमुख, औंध सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, सर्व सहकारी पोलीस कर्मचारी, तालुका पोलीस सह सातारा श्वानपथक आणि गुन्हे अन्वेषणचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.