शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

सातारा दुर्गा उत्सवात वर्गणी नकोे... प्रायोजक व्हा !

By admin | Updated: September 17, 2014 22:25 IST

हायटेक आमंत्रण,हस्ते-परहस्ते प्रायोजकत्व

प्रगती जाधव-पाटील- सातारा  दुर्गा उत्सवात तरूण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी छुप्या पध्दतीने इच्छुकांनी व्यूहरचना सुरू केली आहे. आचारसंहितेच्या कचाट्यात न सापडता आपल्या नावाचा बोलबोला करून घेऊन हे उमेदवार वर्गणी ऐवजी प्रायोजकत्व देण्यास प्राधान्य देत आहेत.निवडणुकीत प्रभावी मतदार म्हणून तरूणाईकडे सर्वांचेच लक्ष आहे. स्वत:चे मत असणारी आणि कोणत्याही आमिषांना बळी न पडणारी ही तरूणाई आपल्या बाजूला वळवून घ्यायची असेल तर त्यासाठी त्यांच्याच आवडीच्या क्षेत्रात घुसले पाहिजे हे इच्छुकांना चांगलेच समजले आहे. त्यामुळे त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. अनायसे दुर्गोत्सव उंबरठ्याशी येऊन पोहोचला आहे. निवडणूक प्रचारासाठी जेमतेम एक महिना मिळाला आहे. यात महिला मतदारांना आकर्षित करायचे असेल तर त्यासाठी हीच संधी आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी आपापल्या परीने खास महिलांसाठी रास-दांडियाचे आयोजन करून विविध प्रकारची आकर्षक बक्षिसे भेट देण्याचे ठरविले आहे. वर्गणी देऊन मंडळाला खूष करण्यापेक्षा दांडियाच्या स्पर्धा घेऊन त्यात यशस्वी होणाऱ्या मतदाराला थेट बक्षीस देण्याची आयडिया यावेळी काढण्यात आली आहे. दरवर्षीपेक्षा यंदाचा दुर्गोत्सवात महागड्या वस्तू भेट म्हणून मिळणार आहे. काही मंडळांनी वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही, मायक्रोवेव्ह यांसारखी बक्षिसे खास महिलांसाठी ठेवण्याचे ठरविले आहे, तर तरूणाईला आकर्षित करण्यासाठी महागडे अँड्रॉइड मोबाईल ‘विथ नेट पॅक’ देण्याची तयारीही सुरू आहे. आचारसंहितेचा धसका घेऊन त्या नियमात ही बक्षिसे कशी बसतील याविषयी सध्या कथ्याकूट सुरू आहे. लवकरच यावर तोडगा काढून ही बक्षिसे अंतिम करण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे. हायटेक आमंत्रणतरूणाईपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वाधिक जवळचे माध्यम सध्या व्हॉटस् अ‍ॅप, टेलिग्राम, व्हायबर आहे. या माध्यमातून सध्या विविध ग्रुपस् अ‍ॅक्टिव झाले आहेत. नवरात्र आणि दांडियाच्या अनुषंगाने होणाऱ्या छोट्या छोट्या माहितीही या ग्रुपवर येवू लागल्या आहेत. नवरात्रीच्या आधीपासूनच यंदा मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी तरूणांना आकर्षित करण्यासाठी हा नवा फंडा आजमावला आहे. त्यामुळे यंदा अनेकांना हायटेक आमंत्रण मिळत आहेत.हस्ते-परहस्ते प्रायोजकत्वजिल्ह्यातील अनेक उमेदवारांना दांडियाच्या माध्यमातून युवावर्गाला ैऐन निवडणूककाळात खूश ठेवायचे आहे. रास-दांडिया ही उत्तम संधी असली, तरी थेट सहभाग टाळावा लागत आहे. त्यामुळेच डोळ््यावर येणार नाही, अशा रीतीने दांडियासाठी हस्ते-परहस्ते पैसा पुरविण्याचे नियोजन सुरू आहे. फारसे चर्चेत नसलेल्या कार्यकर्त्यांना नवरात्रोत्सवात पुढे केले जाण्याची शक्यता असून, त्यांच्या मार्फतच दांडियासाठी आणि बक्षिसांसाठी निधी पुरविण्याचे नियोजन अनेकांनी केले आहे.