शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

काहीही करा.. आम्ही इथंच बसणार ! सातारा पालिका प्रशासन हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 9:41 PM

राजवाडा ते मंगळवार तळे या रस्त्यावर पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून दुमजली भाजी मंडई बांधली. ग्राहकांच्या गाड्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली.

ठळक मुद्देराजवाडा-मंगळवार तळे रस्ता पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातवाहतूक कोंडी कायम

सातारा  : राजवाडा ते मंगळवार तळे या रस्त्यावर पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून दुमजली भाजी मंडई बांधली. ग्राहकांच्या गाड्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली. रस्त्यावर भाजी, फळे विक्री व इतर व्यवसाय करणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होईना. कारवाई करूनही या रस्त्यावरील अतिक्रमण पुन्हा फोफावत असल्याने आता प्रशासनही पुरते हतलब झाले आहे.

राजवाडा भाजी मंडईची उभारणी केल्यानंतर सर्व भाजी विक्रेत्यांचे या मंडईत पुनर्वसन करण्यात आले. वाहतुकीला अडथळा ठरू नये म्हणून फळविक्रेत्यांनाही या मंडईत जागा देण्यात आली. मात्र, फळविक्रेत्यांना ग्राहक येत नसल्याचे कारण देत मंडईत व्यवसाय करण्यात नकार दर्शविला. त्यामुळे अनेक फळविक्रेते गेल्या अनेक वर्षांपासून राजवाडा-मंगळवार तळे रस्त्यावरच फळविक्री करीत आहेत.

पालिकेने विक्रेत्यांना चकाचक मंडई बांधून दिली. मात्र, अतिहव्यासापोटी मंडईत बसणाºया व्यावसायिकांनी रस्त्यावरही ठाण मांडले. पालिकेची पावती फाडण्याची वेळ टळून गेल्यानंतर टोपल्या आणि हातगाड्या घेऊन ही मंडळी राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर बसतात. यामुळे वाहतुकीची कोंडी आणि किरकोळ अपघातांची संख्या वाढतच चालली आहे.

वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील होत गेल्याने पालिकेच्या वतीने या मार्गावरील सर्व अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविली होती. कारवाईनंतर या रस्त्याने मोकळा श्वास घेतला होता. काही दिवसांनंतर पुन्हा हा मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला. सध्या राजवाडा बसस्थानकापासून मंगळवार तळ्यापर्यंत भाजी विक्रेते, व्यावसायिकांनी रस्त्यावरच ठाण मांडले आहे. कारवाई करूनही तशीच परिस्थिती निर्माण होत असल्याने आता प्रशासनही हतलब झाले आहे.रस्त्याच्या दुतर्फा पार्किंगराजवाडा ते मंगळवार तळे या मार्गावर भाजी व फळविक्रेत्यांची संख्या अधिक आहे. भाजी मंडई सोडली तर इतरत्र कोठेही पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा दररोज वाहने पार्क केली जात आहे. त्यामुळे गर्दीतून वाट काढताना वाहनधारकांसह नागरिकांनी दमछाक उडत आहे. याबाबत ठोस कारवाई करणे गरजेचे बनले आहे.

सकाळी फळे.. रात्री भाजी विक्रीनो हॉकर्स झोन असतानाही राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर हंगामी व्यावसायिकांनी आपले बस्तान बसविले आहे. या रस्त्यावर सकाळी नऊपासून सायंकाळी पाचपर्यंत फळांचे गाडे असतात तर सायंकाळी पाचनंतर येथे भाजीमंडई भरते. विक्रेते व वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना सकाळी शालेय विद्यार्थी तर सायंकाळी नोकरदारांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMarketबाजार