शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक म्हणजे राजकीय अड्डा..!

By admin | Updated: April 28, 2015 23:45 IST

उदयनराजे : स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही विरोध पहायला मिळणार

सातारा : यंदाच्या डीसीसी निवडणुकीत थोडे वेगळे चित्र पहायला मिळाले तर काही नवल वाटणार नाही, कारण स्वार्थी, केंद्रीत विचारांना आता विरोध सुरु झाला असून, तो विरोध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भविष्यातील निवडणुकांतही सर्वत्र पहायला मिळेल, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. सहकारातील तत्त्वानुसार, जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बँकेत राजकारणाला थारा नसला पाहिजे, पंरतू या उलट काही लोकांमुुळे ‘डीसीसी’ चा राजकीय अड्डाच बनला गेला आहे, राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या पंचायत राज संकल्पनेनुसार सामान्य जनतेला सत्तेचे विकेंद्रीकरण अपेक्षित आहे. तथापि, देशात आणि राज्यात ज्याठिकाणी बरीच वर्षे सत्तेचे केंद्रीकरण झाले आहे, त्या ठिकाणी अती तेथे माती, यानुसार, जनतेने अशा व्यक्तिना झुगारुन घरी बसवले आहे. जिल्हा बँकेच्या आताच्या निवडणूक पार्श्वभूमीचा विचार करता, सामान्य जनता स्वार्थासाठी सत्ताकेंद्रीत राजकारण करणाऱ्यांंना घरी बसवेल , असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.आम्ही कुणाच्या पॅनेलचे नसून आम्ही जनतेचे उमेदवार आणि प्रतिनिधी आहोत असे सुरुवातीलाच नमुद करत याविषयी अधिक मतप्रदर्शन करताना, खासदार उदयनराजे भोसले यांनी पुढे नमुद केले आहे की, इकडे मीच, तिकडे मीच, डीसीसीतही मीच अशा स्वार्थी पध्दतीचे सत्ता केंद्रीत विचार वारंवार दिसत आहेत. अशा प्रवृत्तींमुळे नावापुरती लोकशाही अस्तित्वात राहील आणि ते देशाला अत्यंत घातक आहे. या विरुध्द सत्तेचे विकेंद्रीकरण, पंचायत राज्य संकल्पना याविषयी जागृती घडविण्यासाठी यापूर्वीही अनेकदा भाष्य केले आहे, डीसीसीत नवीन चेहऱ्यांंना संधी देणे, सत्तेचे विकेंद्रीकरण, पक्षीय राजकारण विरहीत बँक अशीही भूमिका वेळोवेळी मांडली आहे, त्यामुुुळे अनेकांची कोंडी जरुर झाली ; पण कोंडी झाली तरी त्यांची खोडी काही केल्या जात नाही, अशी वस्तुस्थिती आहे. लोकांनाच आता अशा कोडगेपणाचा कंटाळा आला आहे. (प्रतिनिधी)