छगन भुजबळ, नाशिकचे पालकमंत्रीपद अन् मनोज जरांगे-पाटलांची टीका; सुनिल तटकरेंनी व्यक्त केलं स्पष्ट मत, म्हणाले..

By प्रमोद सुकरे | Updated: May 22, 2025 16:33 IST2025-05-22T16:31:25+5:302025-05-22T16:33:44+5:30

प्रमोद सुकरे  कऱ्हाड: छगन भुजबळ यांना मंत्रीपदाची शपथ दिल्यापासून नाशिकच्या पालकमंत्री पदावरून चर्चा सुरू झाल्या आहेत हे खरे आहे. ...

Discussion on the post of Guardian Minister of Nashik since Chhagan Bhujbal was sworn in as a minister Sunil Tatkare clearly stated | छगन भुजबळ, नाशिकचे पालकमंत्रीपद अन् मनोज जरांगे-पाटलांची टीका; सुनिल तटकरेंनी व्यक्त केलं स्पष्ट मत, म्हणाले..

छगन भुजबळ, नाशिकचे पालकमंत्रीपद अन् मनोज जरांगे-पाटलांची टीका; सुनिल तटकरेंनी व्यक्त केलं स्पष्ट मत, म्हणाले..

प्रमोद सुकरे 

कऱ्हाड: छगन भुजबळ यांना मंत्रीपदाची शपथ दिल्यापासून नाशिकच्या पालकमंत्री पदावरून चर्चा सुरू झाल्या आहेत हे खरे आहे. मात्र भुजबळ व नाशिकच्या पालकमंत्री पदाचा चर्चेमध्ये तथ्य नाही. नाशिक व रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती आहे. ही पालकमंत्री पदे लवकरात लवकर भरली जावीत अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी असून मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री याबाबत लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कराड येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

अजित पवारांनी भुजबळ यांना मंत्रीपद देऊन चूक केली आहे असे मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत. याकडे लक्ष वेधले असता तरकरे म्हणाले, आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळेच जरांगे त्यांचे मत मांडत आहेत.

बीड मधील गुन्हेगारी प्रवृत्तीवर मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री बीडचे पालकमंत्री म्हणून अजित दादांचे यांचे गांभीर्याने लक्ष नसल्याची टिका विरोधक करीत आहेत? याबाबत विचारले असता अजित पवारांचे तेथे चांगले लक्ष असल्याचेही सुनील तटकरे यांनी सांगितले .

मी ही दिल्लीत आता चांगला रुळलोय ..

तुम्ही दिल्लीत काम करता आहात. तेथे तुम्हाला शरद पवारांची उणीव भासते का? याबाबत छेडले असता ,मीही आता दिल्लीत चांगला रुळलोय असे मिश्किल उत्तर तटकरे यांनी देणे पसंत केले.

नाईकांचा योग्य सन्मान ठेवला जाईल

शिराळा विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री, ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईक यावेळी उपस्थित होते. याबाबत माध्यमांनी लक्ष वेधले असता, त्यांचाही आमच्या पक्षात योग्य सन्मान ठेवला जाईल असेही तटकरे यांनी सांगितले.

Web Title: Discussion on the post of Guardian Minister of Nashik since Chhagan Bhujbal was sworn in as a minister Sunil Tatkare clearly stated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.