शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

‘धोम’ डोहाच्या स्वच्छतेसाठी एकवटले ग्रामस्थ

By admin | Updated: November 4, 2015 00:10 IST

प्रशासनासह समूह संस्थेचा पुढाकार : प्रभाकर देशमुख यांनी केली पाहणी; स्वच्छतेसाबाबत कामयस्वरूपी उपाययोजना आखण्याची ग्वाही

वाई : वाई तालुक्यातील धोम येथील प्रसिद्ध गायमुख डोहाच्या स्वच्छतेसाठी ग्रामस्थ एकवटले असून स्वच्छतेचे काम प्रगतीपथावर आहे. सुमारे एक किलोमीटर लांबीच्या हा डोहातील जलपर्णी, निर्माल्य तसेच कचरा काढण्यात येत आहे. या कामाची पाहणी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केली. तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणाऱ्या या कामाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी समूह संस्थेचे मकरंद शेंडे, मंदार सोनपाटकी, स्वप्नील भिलारे, आनंद पटवर्धन, श्रीरंग जोशी, श्रीरंग प्रभुणे, विजय, नादंगावकर, मंदार प्रभुणे, गायत्री पटवर्धन, सोनिया मलटणे, शीतल काळे, महादेव गायकवाड, डॉ़ अविनाश नायकवडी, अरविंद पोळ, सुहाष पोळ, महादेव पोळ, शशिकांत उभे, प्रदीप मोरे, प्रशांत पोळ, संजय पोळ, प्रदीप पोळ, गणेश पांबरे, धवल गार्डी, संभाजी पोळ, सचिन पोळ, अमजद सैय्यद, कृष्णा कांबळे उपस्थित होते.प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘गेली दोन महिन्यांपासून समूह संस्था व धोम ग्रामस्थांनी प्रशासनाच्या मदतीने कृष्णानदी स्वच्छता अभियान चालू केले आहे. कृष्णानदीचा उगम वाई तालुक्यातून असून, नदीच्या उगमानतंर नदीपात्रावर धोम धरण आहे़ वाढते प्रदूषण, अतिक्रमण, श्री क्षेत्र धोम येथील नदीपात्रात प्रवाही पाणी, पाण्याची कमतरता यामुळे नदीचे सौंदर्य हरपून नदीची भयावह स्थिती झाली होती़ नदी पात्रात विविध प्रकारच्या वनस्पती, शेवाळ तसेच धार्मिक विधी करताना नदीपात्रात अर्पण केलेले नारळ, कापडे व इतर वस्तू यामुळे नदीचे पाविन्न्य हरपून गेले होते़ नदीची ही दयनीय स्थिती पाहून विविध पर्यावरणवादी सामाजिक संस्था व प्रशासन स्वच्छतेसाठी धावून आल्या आहेत. यांच्या माध्यमातून काही तात्पुरत्या स्वच्छतेचे तसेच कायम स्वरूपी जल शुद्धीकरणाचे विविध उपाययोजना करण्याकरिता नियोजन आखण्यात आले आहे़ ते म्हणाले, कृषिप्रधान भारत देशाच्या रक्तवाहीनी असलेल्या नद्या आता प्रदूषणाच्या विळख्यात आडकलेल्या आहेत. जीवनदायनी असलेल्या या नद्यांंची प्रदूषणातून मक्तता करणे काळाची गरज आहे़ नाहीतर पर्यावरणाचे संतूलन ढासळून संपूर्ण सजीव सृष्टीला याचे गंभीर परीणाम भोगावे लागतील़ यासाठी नागरीकांमध्ये जागृकता येणे गरजेचे आहे़ समूह सारख्या सामाजिक संस्था नागरीकांना जागृत करून प्रशासनाला बरोबर घेऊन नदी स्वच्छतेचे काम करताहेत हे प्रशंसनीय आहे़’ असे उद्गार आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी काढले़ नदी प्रदूषण ही एक राष्ट्रीय समस्या आहे़ यासाठी नदीच्या सुरुवातीपासून स्वच्छता करण्यासाठी समुह संस्था व प्रशासन यांच्या वतीने धोम येथील विविध पौराणिक घाट स्वच्छ करण्यात आला. नदी पात्रात असणाऱ्या विविध वनस्पतींमूळे पूर्ण जलसाठयाच्यावर अतिक्रमण केले असून, पाणी प्रदूषित होऊन दुर्गंधीयुक्त झाले आहे़ यासाठी समुह संस्थेच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान राबविण्यात आले़ या स्वच्छता उपक्रमास प्रातांधिकारी रवींद्र खेबूडकर व तहसीलदार सदाशिव पडदुणे यांनी दोन जेसीबी, टॅक्टर्स व इतर स्वच्छतेसाठी लागणारी साधनसामुग्री उपलब्ध करून दिली होती़ यावेळी पुण्याचे आयुक्त प्रभाकर देशमुख ,समुह संस्थेचे संचालक मकरंद शेंडे, धोम ग्रामस्थ व इतर मान्यवरांनी परिसराची पाहणी करून समस्येवर कायस्वरूपी काय तोडगा काढता येईल याची माहिती घेतली. प्रभाकर देशमुख यांनीशासन नदी स्वच्छ समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली़ (प्रतिनिधी)कायमस्वरूपी उपययोजनांची गरज कृष्णानदीचे प्रदूषण ही एक गंभीर समस्या असून, यासाठी नदीकाठावरील गावे, वाई शहरातील घाट संस्थान, प्रशासन व सामाजिक संस्थांनी मिळून नदी स्वच्छतेसाठी व नदी कायमस्वरूपी प्रवाही होण्यासाठी दुरोगामी उपाय योजना करण्याची गरज आहे. तरच कृष्णा नदीची प्रदूषणाच्या विळख्यातून कायस्वरूपी मुक्तता होईल. अशी अपेक्षा आयुक्त देशमुख यांनी व्यक्त केली.