devendra fadnavis Maha janadesh Yatra in satara | महाजनादेश यात्रा आज साताऱ्यात; तीन ठिकाणी होणार सभा

महाजनादेश यात्रा आज साताऱ्यात; तीन ठिकाणी होणार सभा

ठळक मुद्देभाजपाची महाजनादेश यात्रा रविवारी सातारा जिल्ह्यात येत असून तीन ठिकाणी मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार आहे. खंडाळा, वेळे, सुरूर फाट्यावरुन वाई शहरात यात्रा येणार.कऱ्हाडमध्ये सायंकाळी सभा होणार आहे.

सातारा - भाजपाचीमहाजनादेश यात्रा रविवारी (15 सप्टेंबर) सातारा जिल्ह्यात येत असून तीन ठिकाणी मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार आहे. वाई, सातारा आणि कऱ्हाडमध्ये होणाऱ्या सभेत ते काय बोलणार आणि कोणाकोणाचा प्रवेश होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भाजपाच्या महाजनादेश यात्रेचे रविवारी दुपारी सातारा जिल्ह्यातील शिरवळजवळ आगमन होणार आहे. त्यानंतर खंडाळा, वेळे, सुरूर फाट्यावरुन वाई शहरात यात्रा येणार आहे. त्याठिकाणी दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होईल. या सभेनंतर ही यात्रा पाचवड, आनेवाडी, लिंबफाटामार्गे सातारा शहरात येईल. यावेळी शहरातून रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी साडे तीनला सैनिक स्कूल मैदानावर मुख्यमंत्र्याची सभा होणार आहे. तर सायंकाळच्या सुमारास ही यात्रा  नागठाणे, काशिळमार्गे कऱ्हाडला जाणार आहे. कऱ्हाडमध्ये सायंकाळी सभा होणार आहे. या यात्रेत मुख्यमंत्र्यांबरोबरच भाजपामध्ये प्रवेश केलेले उदयनराजे भोसले, माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे तसेच जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी सहभागी होतील.
 

Web Title: devendra fadnavis Maha janadesh Yatra in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.