उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय दरे दौऱ्यावर, विकासकामांबाबत घेतली आढावा बैठक
By दीपक शिंदे | Updated: January 13, 2025 18:22 IST2025-01-13T18:22:12+5:302025-01-13T18:22:44+5:30
सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तरेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त दोन दिवसीय दरे दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान आज जिल्ह्यातील विविध विभागांच्या ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय दरे दौऱ्यावर, विकासकामांबाबत घेतली आढावा बैठक
सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तरेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त दोन दिवसीय दरे दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान आज जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत दरे येथे बैठक घेतली. तापोळा कोयना आणि महाबळेश्वर परिसरात सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित पर्यटन व इतर विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यातील तापोळा कोयना व महाबळेश्वर परिसरात पर्यटन विकासाची कामे सुरू आहेत तसेच काही कामे ही प्रस्तावित आहेत. या कामांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दर येथे बैठक घेतली. या बैठकीला पोलीस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक किरण जगताप यांच्यासह विविध तालुक्यातील तहसीलदार प्रांताधिकारी व पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत.